Cricket : आयसीसीच्या निर्णयामुळे क्रिकेट बदलणार, खेळातली चुरस आणखी वाढणार

दुबई : आयसीसीने क्रिकेटच्या निवडक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमुळे क्रिकेटमधील चुरस आणखी वाढणार आहे.


कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही संघांच्या कर्णधारांची संमती असल्यास सामना सुरू असताना लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडू वापरता येणार आहे. अपुऱ्या प्रकाशामुळे वाया जाणारा वेळ कमी करण्यासाठी आयसीसीने हा नवा नियम केला आहे.



कसोटी सामन्यात अपुऱ्या प्रकाशामुळे सामन्यात व्यत्यय आला तर दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या संमतीने पुरेसा प्रकाश येईपर्यंत अथवा दिवसाचा खेळ संपेपर्यंत लालऐवजी गुलाबी चेंडू वापरता येणार आहे. अपुऱ्या प्रकाशामुळे वेळ वाया जाऊ नये यासाठी हा नियम आयसीसीने केला आहे. पण हा नियम लागू करण्यासाठी आयसीसीने एक विशेष अट घातली आहे. दोन्ही संघांच्या क्रिकेट बोर्डांनी संमती दिली तरच अपुरा प्रकाश असताना पंच कसोटी सामन्यात लाल ऐवजी गुलाबी चेंडू वापरण्यासाठी दोन्ही कर्णधारांची परवानगी विचारणार आहेत. दोन्ही कर्णधारांनी परवानगी दिली तरच कसोटी सामन्यात पुरेसा प्रकाश येईपर्यंत अथवा दिवसाचा खेळ संपेपर्यंत लालऐवजी गुलाबी चेंडू वापरता येणार आहे. आयसीसीचा नवा नियम फ्लडलाइट्सने सुसज्ज असलेल्या मैदानांमध्ये पारंपरिक कसोटी सामन्यांना लागू होणार आहे. दिवस-रात्र सामने गुलाबी चेंडूने खेळले जाणे सुरूच राहील. तसेच आयसीसीने एमसीसीच्या सहकार्याने प्रकाश तंत्रज्ञानावरील संशोधनासाठी निधी देण्याच्या योजनेलाही सहमती दर्शवली आहे.



आयसीसीच्या आणखी एका नव्या नियमानुसार एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मुख्य प्रशिक्षक किंवा निवडक कर्मचाऱ्यांना मैदानावर येण्याची परवानगी मिळणार आहे. आतापर्यंत, फक्त ड्रिंक्स हाताळणारे खेळाडूच ड्रेसिंग रूममधून संदेश पाठवू शकत होते. या व्यतिरिक्त टी20आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आता दोन डावांच्या मध्ये १५ मिनिटांचा ब्रेक असेल आणि खेळ पुन्हा सुरू झाल्यावर फलंदाजांना तयार राहावे लागेल. या निर्णयामुळे सामने लवकर संपण्यास मदत होणार आहे.



आयसीसीने लेग साईड वाईड ट्रायललाही मंजुरी दिली आहे. तसेच हॉक आय तंत्राची मदत घेऊन बॉलिंग अॅक्शनवर आलेल्या आक्षेपांविषयी निर्णय देण्याचा निर्णय घेतला आहे.


या व्यतिरिक्त आयसीसीने जून जुलैऐवजी यंदा १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान महिला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दहा संघांना सोबत घेऊन वीमेन्स इमर्जिंग नेशन्स ट्रॉफी २०२६ या स्पर्धेचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू केले आहे.


आयसीसीने कॅनडाच्या क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व बरखास्त केले आहे. भ्रष्टाचार प्रकरणी आयसीसीने ही कठोर कारवाई केली आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून