Majhi Kanya Bhagyashree Yojana : ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे फायदे ऐकूनही तुम्ही चकीत व्हाल

Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही एक महत्त्वाची योजना असून, या माध्यमातून मुलींना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळत असून त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे.


मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला बळ देणे आणि समाजाचा दृष्टिकोन बदलणे या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सरकारकडून थेट ५० हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जात आहे. विशेष म्हणजे, केवळ एकच नाही तर दोन मुली असलेल्या कुटुंबांनाही या योजनेचा मोठा फायदा मिळत आहे.



काय आहे ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ?


‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, १ एप्रिल २०१६ रोजी तिची सुरुवात करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या संगोपन व शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.



आर्थिक लाभ आणि विमा संरक्षण


या योजनेअंतर्गत मुलगी आणि आईच्या संयुक्त नावाने बँक खाते उघडले जाते. या खात्यावर एक लाख रुपयांपर्यंत अपघात विमा आणि पाच हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते. मुलीच्या जन्मानंतर पालकांनी नसबंदी केल्यास ५० हजार रुपयांची मदत दिली जाते. तसेच दोन मुलींनंतर नसबंदी केल्यास दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी २५ हजार रुपये जमा केले जातात.



योजनेसाठी कोण पात्र ?


या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कुटुंबाकडे आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, मोबाईल क्रमांक आणि मुलीचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक असते. तिसरे अपत्य असले तरी या योजनेचा लाभ केवळ दोन मुलींपर्यंतच मर्यादित आहे.



योजनेसाठी अटी काय ?


योजनेतील विमा लाभ मिळवण्यासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ती दहावी उत्तीर्ण आणि अविवाहित असावी लागते. दुसऱ्या प्रसुतीवेळी जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघींनाही योजनेचा लाभ दिला जातो. बालगृहातील अनाथ मुली आणि दत्तक घेतलेल्या मुलींनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.



अर्ज कुठे आणि कसा कराल ?


या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह महिला व बाल विकास विभागाकडे जमा करावा लागतो. अधिक माहितीसाठी संबंधित विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



मुलींच्या सक्षमीकरणाकडे मोठे पाऊल


‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे. या योजनेमुळे समाजात मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होत आहे.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल