Mumbai Police Video : मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, आत्महत्या करण्यास गेलेल्या महिलेचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. मरीन ड्राइव्ह परिसरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे ४६ वर्षीय महिलेचा जीव वाचवण्यात यश आले. ३१ मे रोजी घडलेल्या या घटनेत संबंधित महिला समुद्रात उतरल्याचे निदर्शनास आले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरू केले आणि मोठी दुर्घटना टळली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुंबई पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे. (Mumbai Police Viral Video)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे ११:२५ वाजण्याच्या सुमारास मरीन ड्राइव्ह प्रोमेनेड परिसरात घडली. याच वेळी गस्त घालत असताना पोलीस कॉन्स्टेबल जयेश माळी यांच्या लक्षात आले की, एक महिला समुद्राच्या दिशेने उडी घेत आहे. सदर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.

यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या काही नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य केले. सर्वांच्या प्रयत्नांतून संबंधित महिलेला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये पोलीस आणि नागरिक बचावकार्य करताना दिसत आहेत.



घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सोमेश्वर चौगुले आणि पोलीस उपनिरीक्षक गागरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली. त्यानंतर महिलेला उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती दिली असून सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस आणि नागरिक यांच्या समन्वयाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या बचावकार्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अनेकांनी पोलीस कॉन्स्टेबल जयेश माळी यांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे अभिनंदन केले आहे. मरीन ड्राइव्हसारख्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नियमित गस्त किती महत्त्वाची आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन