Sunil Tatkare : पार्थ पवारांवर नाराज नाही - सुनील तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare ) यांच्या पदांचा उल्लेख टाळल्यामुळे दोन्ही नेते पार्थ पवार यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यावर खुद्द तटकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, "अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार (Parth Pawar) आणि जय पवार (Jai Pawar) हे राजकारणात अधिक सक्रिय झाले असून ही अतिशय चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे. पार्थ पवार किंवा पवार कुटुंबातील कोणावरही माझी कोणतीही नाराजी असण्याचे कारण नाही. अजितदादांच्या निधनानंतर आता पक्षाला नवा आकार देत पुढची मजबूत वाटचाल करणे हेच आपले मुख्य ध्येय आहे", असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.



दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर पुन्हा नाराजी व्यक्त तटकरे (Sunil Tatkare ) म्हणाले, अजितदादांचे पार्थिव समोर असताना आणि कुटुंबासह संपूर्ण पक्ष दुःखात बुडालेला असताना काही नेत्यांनी ज्या प्रकारे विलीनीकरणाच्या चर्चा सुरू केल्या, ते अत्यंत वेदनादायी होते. हिंदू धर्माच्या परंपरेनुसार आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार सुतकाचे विधी सुरू असतानाच, दुसरीकडे पक्षातील काही प्रमुख नेत्यांनी वृत्तवाहिन्यांवर मुलाखतींचा सपाटा लावला होता. 'ही दादांची अंतिम इच्छा होती' किंवा 'अमुक एका तारखेला पक्षाचे विलीनीकरण होणार होते' अशा वावड्या उठवण्यात आल्या. जे नेते विलीनीकरणाचा सतत जप करत होते, त्यांच्यापैकी एकाच्याही मनात अजितदादांच्या पश्चात तात्काळ उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे कोणी हाती घ्यावीत, हा विचार का आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



अजितदादांची मूळ इच्छा सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षासोबत (BJP) जाऊन काम करण्याची होती. अगदी २०१४ च्या राजकीय घडामोडींपासून ते भाजपासोबत जाण्यास कमालीचे इच्छुक होते आणि ही इच्छा त्यांनी पक्षांतर्गत अनेकदा बोलून दाखवली होती. याच भूमिकेचा भाग म्हणून त्यांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत पहाटेचा ऐतिहासिक शपथविधी केला होता. त्यामुळे विलीनीकरणाच्या वावड्या उठवण्यापेक्षा पक्षाच्या विचारसरणीशी आणि दादांच्या मूळ भूमिकेशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. आता पार्थ पवारांसारखे तरुण नेतृत्व समर्थपणे मैदानात उतरत असल्यामुळे पक्षाला नवीन ऊर्जा मिळणार असून, सर्व ज्येष्ठ नेते आणि तरुण फळी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील वाटचाल अधिक गतिमान करतील, असेही तटकरे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण