Team India's international cricket schedule : टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज, पुढील सामन्यांचे वेळापत्रक जाणून घ्या

Team India's international cricket schedule : आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व मोठ्या दिमाखात पार पडलं आहे. वर्ष 2026 च्या सुरूवातीला वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आता पुरूषांच्या संघाने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सला मात दिली आणि आयपीएल 2026 जेतेपदावर नाव कोरलं. यंदाच्या पर्वात (पुरुष संघ ) आरसीबीने जेतेपद कायम राखलं. सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.



टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज


आता फ्रेंचायझी क्रिकेटमधून बाहेर येत टीम इंडिया आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वनडे, टी20 आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचं नेतृत्व शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. तर टी20 संघाचं कर्णधारपदी सूर्यकुमार यादवकडे असू शकते.



2026 पर्यंतचं क्रिकेट वेळापत्रक समोर


भारतीय संघाचं डिसेंबर 2026 पर्यंतचं क्रिकेट वेळापत्रक समोर आलं आहे. 6 जूनपासून सामन्यांना सुरुवात होणार असून पहिला सामना न्यू चंदीगडच्या मैदानात होणार आहे. या मैदानात भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने असणार आहे. हा कसोटी सामना असून त्यानंतर वनडे आणि टी20 मालिका
खेळल्या जातील.



टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक


जून 2026


6-10 जून: भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना


13-20 जून: भारत-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका (3 सामने)


26-29 जून: भारताचा आयर्लंड दौरा (2 टी20 सामने)


 

जुलै 2026


1-11 जुलै: भारताचा इंग्लंड दौरा (5 टी20 सामने)


14-19 जुलै: भारताचा इंग्लंड दौरा (3 एकदिवसीय सामने)


23-26 जुलै: भारताचा झिम्बाब्वे दौरा (3 टी20 सामने)


 


ऑगस्ट 2026


भारताचा श्रीलंका दौरा (2 कसोटी, 3 टी20) – तारखा अद्याप निश्चित व्हायच्या आहेत


 

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026


17 सप्टेंबर – 3 ऑक्टोबर: आशियाई खेळ 2026, जपान (टी20 स्वरूप)


27 सप्टेंबर – 3 ऑक्टोबर: भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका (3 सामने)


6-17 ऑक्टोबर: भारत-वेस्ट इंडिज टी२० आंतरराष्ट्रीय मालिका (5 सामने)


ऑक्टोबर आणि डिसेंबर 2026


22 ऑक्टोबर – डिसेंबर: भारताचा न्यूझीलंड दौरा (2 कसोटी, 5 एकदिवसीय, 5 टी20)

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून