Minister Adv. Ashish Shelar : रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार

मुंबई,  : रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.


रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी


दूरदृष्य प्रणालीद्वारे रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती,
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, उपसचिव महेश वाव्हळ, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे तसेच, रायगड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.



या बैठकीत रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या संवर्धन व विकासकामांची माहिती देण्यात आली. शिरकाई मंदिर, महादरवाजा आणि वाघ दरवाज्याच्या संवर्धनाची कामे सुरू असून राणी वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. तसेच हत्ती तलाव व फुटका तलाव परिसरातील गाळ काढणे आणि गळती रोखण्याची कामेही सुरू असल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर, रायगडावरील स्वच्छतागृहे, त्यांची देखभाल आणि पाणीपुरवठा यासंदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


यावर मंत्री ॲड. शेलार यांनी पुरातत्व विभाग, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित कंत्राटदार यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. या पाहणीनंतर लवकरच मंत्रालयात एक बैठक घेऊन रायगड विकास प्राधिकरणाची स्वायत्तता, उपलब्ध निधी, देखभाल व्यवस्था, जनसुविधांचे व्यवस्थापन आणि विविध विभागांमधील जबाबदाऱ्या यावर व्यापक चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी