Crime News : काय दिवस आले, फौजी कर्मचाऱ्याकडूनच मागितली ५० हजारांची खंडणी; कुठे घडला संतापजनक प्रकार ?

जळगाव - जमीन व्यवहारात मध्यस्थी केल्याचा दावा करून भारतीय सैन्य दलातील जवान व त्यांच्या वयोवृद्ध वडिलांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी भोजे ता. पाचोरा (जळगाव ) येथील निलेश नामदेव उभाळे यांच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोजे येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले विलास बाबूलाल जाधव यांनी १ जून रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली. फिर्यादीत नमूद केल्या प्रमाणे, भोजे शिवारातील एका प्लॉटच्या खरेदी-विक्री व्यवहारात कोणतीही मध्यस्थी केलेली नसताना आरोपी निलेश उभाळे यांनी मध्यस्थी केल्याचा दावा करत ५० हजार रुपयांची मागणी केली.



फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने मोबाईलवर वारंवार संपर्क साधून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संभाषणांचे मोबाईल रेकॉर्डिंग फिर्यादीकडे उपलब्ध असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याचे समजते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या वयोवृद्ध वडिलांनाही पैशांसाठी त्रास देत धमक्या दिल्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली आले असून भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे फिर्यादीJalgaonत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Police Station) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०८(५), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल रामनाथ पवार करीत आहेत.



दरम्यान, निलेश उभाळे यांच्या विरोधात विविध शासकीय कार्यालये, प्रधानमंत्री कार्यालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रारी व माहिती अधिकार अर्जांच्या माध्यमातून दबाव निर्माण करून काही प्रकरणांमध्ये तडजोडी केल्याचे आरोप होत असल्याची चर्चा परिसरात आहे. तसेच त्यांच्या विरोधात आणखी काही व्यक्तींकडून खंडणी संदर्भातील तक्रारी दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण