लेह-लडाखचा प्रवास ठरला अखेरचा; युवा क्रिकेटपटू अनिकेत काळे यांच्यासह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू

महाराष्ट्रातील क्रिकेट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे युवा क्रिकेटपटू अनिकेत काळे (Aniket kale) यांचे भीषण रस्ते अपघातात (Accident) निधन झाले आहे. लेह-लडाख येथे पर्यटनासाठी जात असताना मध्य प्रदेशातील सेंधवा टोलनाक्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या दुर्घटनेत अनिकेत काळे आणि त्यांचे मित्र बद्रीनाथ नांगरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत काळे, बद्रीनाथ नांगरे, ओंकार साबणे आणि भूषण हे चार मित्र रविवारी रात्री जीपमधून लेह-लडाखच्या दिशेने निघाले होते. सोमवारी दि. १ जून पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास मध्य प्रदेशातील सेंधवा टोलनाक्याजवळ त्यांच्या जीपने समोर असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की, वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला.



या भीषण अपघातानंतर चौघे जण वाहनात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, टोल नाका कर्मचारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. मात्र, अनिकेत काळे आणि बद्रीनाथ नांगरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी ओंकार साबणे आणि भूषण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

अनिकेत काळे हे टेनिस बॉल आणि लेदर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये परिचित नाव होते. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे क्रीडाक्षेत्रात शोककळा पसरली आहे.

अपघाताची माहिती मिळताच, कुटुंबीय आणि नातेवाईक मध्य प्रदेशकडे रवाना झाले. सोमवारी सायंकाळी अनिकेत काळे आणि बद्रीनाथ नांगरे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

 

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा