Lionel Messi Statue:  मेस्सीच्या 70 फूट उंच पुतळ्याला अखेर निरोप! 10 कोटींची भव्य मूर्ती ठरली धोकादायक

कोलकाता : फुटबॉलचा महानायक लिओनेल मेस्सी याच्या  नावाने कोलकातामधील सहा महिन्यपूर्वी उभारण्यात आलेल्या ७०  भव्य पुतळ्याला अखेर हटवण्यात आले आहे. वादळानंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण  झाल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करत हा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला.


वादळानंतर धोक्याचे सावट !



लेक टाऊन परिसरात उभारलेला हा पुतळा जोरदार वाऱ्यांमुळे डगमगू लागल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांदकडून करण्यात आल्या होत्या.प्रशसानने तातडीने चौकशी करत पुतळ्याच्या फाउंडेशन बोल्टमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले.त्यामुळे पुतळा कधीही  कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यामुळे या पुतळ्याचे स्थलांतरण करण्यात आले आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) सोमवारी (1 जून )विशेष मोहीम राबवत हायड्रॉलिक क्रेनच्या मदतीने पुतळा त्याच्या पायापासून वेगळा करण्यात आला.त्यानंतर तो सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला. मात्र यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे ममता बॅनर्जी  सरकारावर टीका होत आहे.


10 कोटींचा भव्य प्रकल्प


सुमारे 10 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेली ही मूर्ती लोखंड आणि फायबरपासून तयार करण्यात आली होती. विशेष म्हणजे, मेस्सीच्या आगमानापूर्वी अवघ्या 40 दिवसांत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात आला होता. 13 डिसेंबर 2025 रोजी भारत दौऱ्यावर आलेल्या लिओनेल मेस्सीने स्वतः या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण साकारला गेला होता. मात्र आता या पुतळ्याच्या स्थलांतरण क्रिडा चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.


चाहत्यांमध्ये नाराजी, सोशल मीडियावर चर्चा


अवघ्या सहा महिन्यांतच पुतळा हटवावा आल्याने मेस्सीच्या चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारावरही जोरदार टीका होत आहेत.






पुन्हा कुठे उभारला जाणार?


सध्या हा पुतळा PWD च्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आला आहे. भविष्यात रवींद्र सरोवर किंवा इको पार्क येथे तो पुन्हा या पुतळ्याला  उभारण्यात येऊ शकतो. मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.


आधीही एका मूर्तीवरून निर्माण झाला होता वाद


याआधी सॉल्ट लेक स्टेडियमबाहेरील ममता बॅनर्जी यांनी डिझाइन केलेली फुटबॉल थीमवरील मूर्तीही हटवण्यात आल्या होत्या. 2017 साली पश्चिम बंगालमध्ये अंडर-१७  फीफा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आले होते.सॉल्ट लेक स्टेडियमच्या आधुनिकीकरणावर १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. स्टेडियमच्या बाहेर व्हीव्हीआयपी गेटसमोर असलेल्या या पुतळ्यात, फुटबॉल बूट घातलेल्या खेळाडूच्या पायात फुटबॉल दाखवले आहेत. कमरेच्या वरच्या भागातही एक फुटबॉल दर्शवला आहे. पुतळ्यावर टीएमसी सरकारचा ब्रँडिंग नारा, विश्व बांगला, कोरलेला आहे. त्याच्या खाली, संकल्पना आणि रचना: ममता बॅनर्जी, असे कोरलेले आहे. मात्र आता पुन्हा पुतळ्याचा वाद बंगालमध्ये घडला आहे. बंगालमधील क्रीडा स्मारकांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम