'Rudram-2' : 'रुद्रम-२' क्षेपणास्त्राची सुखोईवरून यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण सज्जतेत आज आणखी एक मोठी भर पडली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुसेना यांनी मंगळवारी 'सुखोई-३० एमकेआय' या लढाऊ विमानातातून हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या 'रुद्रम-२' या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत घेतलेली ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.



संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातून सोडल्यानंतर या क्षेपणास्त्राने स्वतःहून मार्ग निश्चित करत ठरवलेल्या लक्ष्यावर अचूक आणि थेट वेध घेतला. ओडिशातील चांदीपूर येथील 'एकात्मिक चाचणी श्रेणी'च्या विविध उपकरणांद्वारे गोळा केलेल्या डेटावरून या चाचणीची सर्व उद्दिष्टे साध्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे संपूर्णपणे भारतात विकसित केलेले, घन-इंधन तंत्रज्ञानावर चालणारे हवेतून डागले जाणारे क्षेपणास्त्र आहे. शत्रूचे रडार, दळणवळण यंत्रणा आणि इतर महत्त्वाचे तळ नष्ट करण्यासाठी हे डिझाइन केले गेले आहे. हैदराबाद येथील 'रिसर्च सेंटर इम्रत' ही या प्रकल्पाची नोडल प्रयोगशाळा असून, डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळा, 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' आणि विविध औद्योगिक भागीदारांच्या सहकार्याने हे विकसित करण्यात आले आहे.



संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुक
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, वायुसेना आणि या प्रकल्पाशी संबंधित सर्व भागीदारांचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले की, या यशस्वी चाचणीमुळे भारताचे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान अधिक परिपक्व झाले असून, प्रगत शस्त्र प्रणालीच्या क्षेत्रात 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला यामुळे मोठी गती मिळाली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष आणि संरक्षण संशोधन विभागाच्या सचिवांनीही या यशाबद्दल शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी