मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून वर्सोव्यात 'नरिमन पॉईंट'सारख्या सुविधा उपलब्ध करून देऊ!

खासदार नारायण राणे यांचा विश्वास; वर्सोवा प्रवासी जेट्टी आणि ऑनलाइन तिकीट प्रणालीचा शुभारंभ


मुंबई : "मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचा कायापालट करण्याचे काम भाजप आणि महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. मुंबईचा प्रत्येक विभाग मी जवळून पाहिला असून येथील झोपडपट्ट्या आणि समस्यांची मला पूर्ण जाणीव आहे. आगामी काही वर्षांत मंत्री नितेश राणे आणि संबंधित खात्यामार्फत नरिमन पॉईंटप्रमाणे वर्सोव्यात सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील," असा विश्वास माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.



वर्सोवा (मांडवी गल्ली) येथे आयोजित 'वर्सोवा प्रवासी जेट्टी उद्घाटन आणि सुशोभीकरण' कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पुरन-सिंग, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., संचालक मंडळाचे सदस्य अभिजित ब्रह्मनादकर आणि बाळासाहेब देसाई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सोहळ्यात वर्सोवा ते मढ या जलमार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी 'व्हॉट्सॲप आधारित डिजिटल तिकीट प्रणाली'चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.खा. राणे म्हणाले, "मी ७ वर्षे मुंबईचा नगरसेवक, १२ वर्षे महसूल मंत्री आणि गेली ४० वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात राहून काम केले आहे. आम्ही राजकारण करण्यासाठी येत नाही, तर लोकांचे जीवनमान सुधारावे हाच आमचा धर्म आहे. आमचे कुटुंबीय जात, पात समोर ठेवून काम करत नाही. मुंबईतील नागरिकांना चांगल्या दर्जाचे नागरी वातावरण मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या भागातील अस्वच्छता आणि अवैध बांधकामे हटवून अवघ्या ४५ दिवसांत वर्सोवा जेट्टीचा जो कायापालट झाला, ही तर केवळ सुरुवात आहे; यापुढे हा परिसर आणखी बदलेल," असे राणे म्हणाले.


तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार

कोकणातील विकासाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, "मी जेव्हा सिंधुदुर्गात काम सुरू केले, तेव्हा तेथील 'पर कॅपिटा इन्कम' (दरडोई उत्पन्न) अवघे ३५ हजार रुपये होते, जे आज अडीच लाख रुपयांवर पोहोचले आहे. तिथली स्वच्छता आणि शिस्त संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नाही. तशीच शिस्त आता इथल्या मासेमारी व्यवसायातही आणली जाईल. उघड्यावर मासे टांगलेले दिसणार नाहीत, तर ते योग्य जागी साठवून विक्रीसाठी पाठवले जातील. किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आम्ही जशा बर्फ फॅक्टऱ्या आणि कोल्ड स्टोरेजची साखळी निर्माण केली, तशीच व्यवस्था इथेही उभारली जाईल." वर्सोवा भागात मत्स्य व्यवसायाशी संबंधित बाय-प्रॉडक्ट फॅक्टऱ्या आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट जेट्टी उभारून स्थानिक कोळी बांधव आणि तरुण पिढीसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी केली.
Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा