Nashik TCS Case : मतीन पटेलला दिलासा मिळणार की अडचणी वाढणार; 'तो' व्हाईस सॅम्पल पोलिसांच्या हाती

Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील (TCS Company) तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक शोषण प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान (Nida Khan) ही अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) ताब्यात घेतले.


दरम्यान, TCS प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निदा एजाज खानला (Nida Khan) छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर आरोप आहे. सोमवारी (दि. १) नाशिक पोलिसांसमोर हजर झाले. या गुंतागुंतीच्या प्रकरणात तांत्रिक पुरावे भक्कम करण्यासाठी पोलिसांनी मतीन पटेल (Matin Patel) यांच्या आवाजाचे नमुने (व्हाईस सॅम्पल्स) घेतले आहे, त्यामुळे तपासाला एक नवा अँगल मिळाला आहे.



आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे जाणार


पोलिसांच्या प्राथमिक तपासात गंभीर माहिती समोर आली आहे. निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे सुरक्षित आश्रय मिळवून देण्यासाठी मतीन पटेल (Matin Patel)  याने तेथील घरमालक हनीफ याच्याशी फोनवर संपर्क साधला होता. पोलिसांनी (Police) या गुन्ह्यातील मुख्य दुवा असलेला मोबाईल फोन आधीच जप्त केला आहे. मात्र, रेकॉर्डिंगमधील आवाज मतीन पटेल यांचाच आहे की नाही, हे कायदेशीर व तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.


याच पार्श्वभूमीवर सोमवारी घेण्यात आलेले आवाजाचे नमुने आता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले जाणार आहेत. हा फॉरेन्सिक अहवाल मतीन पटेल यांच्या अडचणीत वाढ करणार की त्यांना दिलासा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतीन पटेल यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसली, तरी संशयिताला आश्रय दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे.


 
Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण