Ashok Kharat : भोंदू अशोक खरातची पुन्हा नाशिकरोड जेलमध्ये रवानगी, सरकारवाडा पोलीस ताबा घेणार

Ashok Kharat : नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला अशोक खरात याला सिन्नर पोलिसांची (Sinner Police० कोठडी संपल्यानंतर मंगळवारी (दि. २) सायंकाळी पुन्हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ( Nashik Road Central Jail ) पाठवण्यात आले आहे. आता भोंदू खरातचा ताबा नाशिकमधील सरकारवाडा पोलीस
(Sarkarwada Police ) घेणार आहे.


अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढील चौकशीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली होती. आता भोंदू खरातचा ताबा नाशिकमधील सरकारवाडा पोलीस घेणार आहे.



कल्पना खरात अद्यापही फरार


दरम्यान, भोंदू खरातची पत्नी संशयित कल्पना खरात ( kalpana kharat ) अद्यापही फरार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस तिचा घेत असली तरीही ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षांत तिच्या विविध बँक खात्यांमधून सुमारे सात कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी देखील खरात नाशिकरोड कारागृहातच होता. तेथून त्याला शिर्डी पोलिसांनी ( Shirdi Police ) ताब्यात घेतले होते. त्यानंतर तो सिन्नर पोलिसांच्या ताब्यात होता.


खरातविरुद्ध आर्थिक फसवणुकीचे एकूण ११ गुन्हे दाखल असून, या प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे भोंदू अशोक खरात याच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासाला आता अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.



आंब्याच्या बागेतून 15 लाखांचे उत्पन्न


दरम्यान दुसरीकडे भोंदूगिरी करून शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे 17 मार्च 2026 रोजी अटक झालेला अशोक खरात (Ashok Kharat) सध्या तुरुंगात असला, तरी त्याच्या मालकीच्या आंबा बागेतून यंदा मोठे उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर आली आहे. खरातच्या 16 एकर क्षेत्रातील केशर आंब्याच्या बागेतून या हंगामात अंदाजे ₹15 लाखांचे उत्पन्न मिळाले असून, त्याच्या अटकेनंतरही शेती आणि व्यावसायिक व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे दिसून येत आहे.


माहितीनुसार, खरातच्या मालकीच्या जमिनीवरील केशर आंब्याच्या बागेतून यंदा सुमारे 1200 ते 1500 क्रेट आंब्यांचे उत्पादन घेण्यात आले. हे आंबे एका व्यापाऱ्याला सरासरी ₹1000 प्रति क्रेट दराने विकण्यात आले. त्यामुळे बागेतून जवळपास ₹15 लाखांचे उत्पन्न मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण