Sex Determination Tests : धक्कादायक! व्हिडिओमुळे काळा धंदा उघड; आरोपी थेट घरी जाऊन करत होता गर्भलिंग निदान चाचणी

पुण्यातील दौंड (Daund Crime) तालुक्यात अवैध गर्भलिंग निदान चाचण्या केल्याच्या संशयावरून यवत पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात पीसीपीएनडीटी (PCPNDC) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या (Video) आधारे ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेवरून यवत परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  (Sex Determination Tests)

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, १४ मे रोजी त्यांना सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्राप्त झाला. या व्हिडिओमध्ये केडगाव परिसरातील एका घरात सोनोग्राफी केली जात असल्याचे दिसून आले. प्राथमिक पडताळणीत अवैध गर्भलिंग निदान चाचण्यांचा संशय निर्माण झाल्यानंतर यवत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पीसीपीएनडीटी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. तपासादरम्यान आरोपी घरोघरी जाऊन सोनोग्राफी करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या कामासाठी मध्यस्थांच्या मदतीने मोठी रक्कम आकारली जात असल्याची माहितीही समोर आली आहे.



यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले की, या प्रकरणात अतुल जाधव नावाच्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. व्हिडिओची सत्यता, वापरण्यात आलेल्या उपकरणांचा स्रोत आणि इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग याबाबत तपास केला जात आहे.

तपास यंत्रणांना प्राथमिक माहितीनुसार आरोपीने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अवैध गर्भलिंग चाचण्या केल्याचा संशय आहे. मात्र याबाबत अधिकृत आकडेवारी तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणामुळे बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली असून संबंधित यंत्रणांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी