फोन घेताना सावधान ! 'जुने फोन नवे करून' विक्री ; कुठे सुरु आहे धक्कादायक प्रकार ?

जामखेड : जामखेड शहरात सध्या मोबाईल ग्राहकांची आर्थिक लूट आणि फसवणूक करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात मोबाईल खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांची अत्यंत पद्धतशीरपणे आर्थिक लूट करणारी एक मोठी साखळी सक्रिय झाली आहे. जुने मोबाईल नवे करून विकणे आणि GST बिलात करचोरी करणे हे प्रकार सुरू असतानाच, आता मोबाईल फायनान्स' (हप्त्यावर मोबाईल) च्या नावाखाली ग्राहकांचे खिसे कापण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


विविध फायनान्स कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करत आणि वेगवेगळ्या खर्चांचे आमिष दाखवून ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा रुपये उकळले जात असल्याने जामखेडकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.



नेमका प्रकार कसा घडतो ?


माहितीनुसार, काही मोबाईल विक्रेते अत्यंत कमी किमतीत जुने, भंगार किंवा स्क्रॅच पडलेले ब्रँडेड मोबाईल गोळा करतात. या मोबाईलचे कव्हर, डिस्प्ले आणि बॅटरी बदलून त्यांना बाहेरून हुबेहूब नव्यासारखे रूप दिले जाते. त्यानंतर, कोणत्याही सील नसलेल्या किंवा बनावट बॉक्समध्ये हे मोबाईल पॅक करून, ग्राहकांना "कंपनी ऑफर" किंवा "डिस्काउंट" चे आमिष दाखवून नवीन फोनच्या किमतीत विकले जात आहेत.


महागडा मोबाईल रोख पैशात घेणे शक्य नसल्याने अनेक मध्यमवर्गीय व तरुण ग्राहक 'झिरो डाऊन पेमेंट' किंवा 'सुलभ हप्त्यांवर' मोबाईल घेण्यास पसंती देतात. ग्राहकांच्या याच गरजेचा गैरफायदा काही मोबाईल शॉपी चालक घेत आहेत. फायनान्स कंपनीचे अधिकृत प्रोसेसिंग शुल्क केवळ काही रुपये असताना, ग्राहक अशिक्षित किंवा घाईत आहे हे पाहून त्यांच्याकडून फाईल चार्ज, लॉगिन फी आणि सर्व्हिस चार्जच्या नावाखाली १ ते ३ हजार रुपये अतिरिक्त उकळले जात आहेत.



इन्शुरन्स काढणे सक्तीचे


"फायनान्स करायचे असेल तर मोबाईलचा इन्शुरन्स काढणे सक्तीचे आहे, नाहीतर लोन मंजूर होणार नाही असे खोटे सांगून ग्राहकांच्या माथी महागडे आणि बोगस इन्शुरन्स मारले जात आहेत. 'झिरो परसेंट इंटरेस्ट' सांगून प्रत्यक्षात ग्राहकांचे उरलेले पैसे वेगवेगळ्या हिडन चार्जेसमध्ये लावून मोबाईलची मूळ किंमत थेट दीडपटीवर नेली जात आहे.



''सर्व्हर डाऊन आहे, बिल व्हॉट्सॲपवर पाठवतो"


जेव्हा एखादा ग्राहक जागृतपणे पक्क्या बिलाची मागणी करतो, तेव्हा त्याच्याकडून १८% GST चे पैसे रोख किंवा ऑनलाईन घेतले जातात. मात्र, बिल देण्याच्या वेळी "सर्व्हर डाऊन आहे," ऑपरेटर नाही" किंवा "व्हॉट्सॲपवर पाठवतो" अशी थातुरमातुर कारणे देऊन ग्राहकांना केवळ एका कच्च्या कागदावर किंवा मोकळ्या पावतीवर लिहून दिले जाते. ग्राहकांकडून वसूल केलेला हा GST चा पैसा थेट दुकानदारांच्या खिशात जात असून, हा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणारा करचोरीचा मोठा घोटाळा आहे.



गरिबांच्या रक्तापाण्याची कमाई लुटण्याचा प्रकार


जामखेडमधील हा प्रकार म्हणजे थेट गरिबांच्या रक्तापाण्याची कमाई लुटण्याचा प्रकार आहे. या प्रकारामुळे प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचीही बदनामी होत आहे. त्यामुळे वस्तू व सेवा कर विभाग, ग्राहक मंच आणि स्थानिक पोलिसांनी या आर्थिक लुटीची गंभीर दखल घेऊन अशा बोगस मोबाईल शॉपीजवर आणि फायनान्स एजंट्सवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


अशा काही ठराविक दुकानदारांना अगोदरही ताकीद दिली होती. पण नफेखोरी आणि लवकर श्रीमंत होण्यासाठी असे काही व्यावसायिक जामखेड मोबाईल मार्केट चे नाव खराब करत आहेत. ग्राहकांना जागृत होण्याची गरज आहे. याबाबत आम्ही लवकरच असोसिएशन कडून बोर्ड लावून ग्राहकांना या बाबतीत सजग करणार आहोत असे जामखेड तालुका मोबाईल असोसिएशन सुनील जगताप यांनी सांगितले आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण