Team India New Coach: अफगाणिस्तान दौऱ्यापूरर्वी टीम इंडियात मोठे बदल; टीम इंडियाला मिळाला नवा फिरकी गुरू !

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळा द्वारा (बीसीसीआय) भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू साईराज बहुतुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (२ मे ) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांना घडवण्याचा मोठा अनुभव असलेल्या बहुतुले यांच्या नियुक्तीमुळे भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागाला अजून बळ मिळेल असं मानलं जात आहे.


BCCI कडून अधिकृत घोषणा


बीसीसीआयने सोशल मिडीयद्वारे पोस्ट करीत याची माहिती दिली. साईराज बहुतुले यांनी अनेक युवा फिरकीपटूंना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि तांत्रिक ज्ञान भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे.


नियुक्तीनंतर बहुतुले यांची प्रतिक्रिया


भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये स्थान मिळाल्यानंतर बहुतुले यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, भारतीय पुरुष संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मनाची गोष्ट आहे. देशासाठी पुन्हा योगदान देण्याची संधी मिळाल्याने मी उत्साहित आहे, असे त्यांनी सांगितले.



कोण आहेत साईराज बहुतुले?


मुंबईतून क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या साईराज बहुतुले यांनी भारतासाठी 2 कसोटी आणि 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र त्यांची खरी ओळख देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीवरुन केली जाते. बहुतुलेस यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १८८ सामने खेळले आहेत. मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ संघांचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी 630 विकेट्स आणि ६१७६ धावा केल्या आहेत. विशेष, म्हणजे बहुतुले सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांच्यासोबतही खेळले आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मोठा मोठी कामगिरी केली आहे. खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर बहुतुले यांनी प्रशिक्षक म्हणूनही आपली छाप पाडली आहे .विदर्भ, केरळ, गुजरात आणि बंगाल संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. IPL मध्येही राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सचे स्पिन बॉलिंग कोच म्हणून त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रशिक्षक म्हणून त्यांचे करियर यशस्वी ठरले आहे.





अंडर-19 विश्वविजेत्या संघाचाही भाग


2022 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय अंडर-19 संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बहुतुले यांचा समावेश होता. तसेच 2024 अंडर-19 विश्वचषकातही त्यांनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 2021 ते 2024 दरम्यान बहुतुले हे बीसीसीआयच्या नॅशनल क्रिकेट अकादमी (आताचे सेंटर ऑफ एक्सलन्स) च्या कोचिंग सेटअपचा भाग होते. भारत 'अ' आणि वरिष्ठ संघासोबत अनेक दौऱ्यांवर काम केल्यानंतर आता त्यांना टीम इंडियाच्या मुख्य सपोर्ट स्टाफमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.



भारतीय फिरकी विभागाला मजबुती मिळणार ?


रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या फिरकीपटूंनी सजलेल्या भारतीय संघाला आता अनुभवी साईराज बहुतुले यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. आगामी मोठ्या मालिकांमध्ये त्यांच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त