BJP-Shivsena : फेरीवाल्यांच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत श्रेयाची लढाई

आपल्या प्रयत्नांचे फळ दृष्टीपथात असल्याचा महापौरांचा दावा, शिवसेना म्हणते आमच्या प्रयत्नांना यश


मुंबई :  मुंबईतील नगर पथविक्रेता अर्थात फेरीवाल्यांचे प्रश्न आता मार्गी लागला जात असून म्हणजे फेरीवाल्यांना क्यू आर कोड (QR Code) आधारित ओळखपत्र देण्याची कार्यवाही आता लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्यावतीने उपमहापौर संजय घाडी आणि शिवसेना (Shivsena) नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेवून याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मुंबईच्या महापौरांनीही आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे याला यश मिळत असल्याचे म्हटले आहे.


या संदर्भात माहिती देताना मुंबईच्या महापौर (Mayor) रितू तावडे (Ritu Tawde) म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाताना नागरिकांना वचन दिले होते की, मुंबईत पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजित हॉकिंग झोनची निर्मिती केली जाईल. त्यासाठी फेरीवाला समिती गठीत करून घेणे, त्यानंतर सर्व पात्र फेरीवाल्यांना नागरी फेरीवाला समितीने ठरविलेल्या हॉकिंग झोनमध्ये स्थलांतरित करून पुनर्वसन करणे, फेरीवाल्यांना क्यू. आर. कोड सहित लायसन्स कम आयकार्ड वितरीत करणे, ही सर्व कार्यवाही करण्यात येईल.



या पार्श्वभूमीवर, महापौर म्हणून मी पदभार स्वीकारल्यानंतर १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा निश्चित करताना त्यामध्ये पात्र फेरीवाल्यांबाबतचा मुद्दाही समाविष्ट केला. त्या दिशेने महानगरपालिकेतील फेरीवाला धोरणाची सर्व माहिती आणि सद्यस्थिती जाणून घेतली. या विषयातील अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.


नगर पथविक्रेता अर्थात फेरीवाला समितीची ऑगस्ट २०२४ मध्ये निवडणूक झाली तरी न्यायप्रविष्ट कारणांमुळे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. या अनुषंगाने महानगरपालिकेतील अनुज्ञापन आणि विधी खाते यांच्या संयुक्त बैठका घेतल्या. नगर पथविक्रेता समिती निवडणूक अंतर्गत मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी माननीय न्यायालयाने परवानगी द्यावी, या संदर्भात प्रयत्न करण्यासाठी विधी खात्याला निर्देश दिले. त्यानुसार २८ मार्च २०२६ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन नगर पथविक्रेता समित्यांचा प्रश्न मार्गी लागला.


निवडून आलेल्या सदस्यांव्यतिरिक्त, नगर पथविक्रेता समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी संबंधित खात्याकडे पाठपुरावा करून वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या. त्या आधारे महानगरपालिकेकडे अर्ज देखील प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची छाननी आणि पडताळणी करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.



एवढेच नव्हे तर, न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आणि नगर पथविक्रेता अधिनियम आधारे एकूण ९९,३४५ फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वितरित करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याची सूचनाही संबंधित खात्याला केली होती. त्यासाठी स्थायी समितीमध्ये विषय मंजूर करण्यात आला. फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात असून लवकरच या फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली आहे. फेरीवाल्यांशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न करणार आहे. कोणावरही अन्याय होऊ नये आणि पात्र असलेल्यांपैकी कोणीही लाभापासून वंचित राहू नये, यादृष्टीने आपण सर्वसमावेशक प्रयत्न यापुढेही करणार आहोत, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात