IND vs AFG: विराट कोहली बाहेर,आता ऋतुराज गायकवाडची एंट्री ? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियात मोठा ट्विस्ट !

Mumbai: अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसाला आहे .स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्याने, त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी क्रिकेट वर्तुळात ऋतुराजला संधी देण्यात यावी अशी चर्चा रंगली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीला हॅमस्ट्रिंगची गंभीर दुखापत झाल्याने तो संघातून बाहेर झाला आहे. या प्रकारच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी साधारणता ३ ते ८ आठवडे लागू शकतात. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याचा सहभाग होऊ सकत नाही अस म्हटलं जात आहे. दरम्यान, कोहलीच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात येऊ शकते. मात्र, ऋतुकाज गायकवाडला श्रीलंका दौऱ्यासाठी इंडिया A संघाचा उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. इंडिया विरुद्ध अफगानिस्थानच्या वनडे मालिकेची सुरुवात १३ जूनपासून होणार आहे. सलामीवीर आणि मधल्या फळीत फलंदाजी करण्याची क्षमता असल्याने तो संघ व्यवस्थापनासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.



रजत पाटीदारलाही मिळू शकते संधी


ऋतुराज भारतीय संघात दाखल झाल्यास इंडिया ‘A’ संघात त्याची जागा रजत पाटीदार घेऊ शकतो. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून चर्चेत आलेल्या पाटीदारने अलीकडेच आपल्या नेतृत्वाखाली संघाला यश मिळवून दिले आहे. त्यामुळे विराटच्या जागी त्यालाही संधी देण्यात येऊ शकते असं मानलं जात आहे.



बीसीसीआयच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष


सध्या बीसीसीआयकडून विराटच्या दुखापतीबाबत अधिकृत वैद्यकीय अहवाल जाहीर झाला आहे. मात्र, जर तो मालिकेबाहेर गेला तर भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात मोठा बदल होणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाडला मिळणारी संधी त्याच्या आंतरराष्ट्रीय करियकसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून