'Killer' Film Set Accident : 'किलर' चित्रपटाच्या सेटवर भीषण स्फोट; २६ वर्षीय टेक्निशिअनचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

चेन्नई : ॲक्शन चित्रपटांमधील (Action Films) थरारक दृश्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत असली तरी त्यामागील मेहनत आणि धोके अनेकदा समोर येत नाहीत. अशाच एका दुर्दैवी घटनेने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी हादरली आहे. अभिनेता-दिग्दर्शक एस. जे. सूर्या यांच्या आगामी 'किलर' (Killer) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या भीषण स्फोटात एका टेक्निशिअनचा (Technician) मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.


माहितीनुसार, ३ जून रोजी चेन्नईतील पेरम्बूर येथील बिन्नी मिल्स कॉम्प्लेक्समध्ये चित्रपटाचे शूटिंग (Shooting) सुरू होते. एका मोठ्या स्फोटाच्या ॲक्शन सीनचे (Action Scene) चित्रीकरण करण्यात येत होते. या दृश्यासाठी स्पेशल इफेक्ट्समध्ये गॅस सिलेंडरचा वापर करण्यात आला होता. मात्र, शूटिंग सुरू असताना अचानक सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला आणि सेटवर एकच गोंधळ उडाला.



या दुर्घटनेत स्पेशल इफेक्ट्स (Special Effects) विभागातील चार टेक्निशिअन गंभीररीत्या भाजले गेले. जखमींमध्ये २६ वर्षीय मदन, २७ वर्षीय शक्तीवेल, २३ वर्षीय सूर्या आणि २४ वर्षीय दिनकरन यांचा समावेश आहे. सर्वांना तातडीने राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मदन यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. शूटिंगदरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच तांत्रिक निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी