Navanth Ban : ही घरकोंबड्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची निवडणूक

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात


Mumbai : विधान परिषदेची निवडणूक कार्यकर्त्यांची राहिलेली नाही, असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी हे लक्षात घ्यावे की उबाठा गटाकडे कार्यकर्तेच शिल्लक राहिले नसतील तर ती कार्यकर्त्यांची निवडणूक कशी राहील? महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्यावेळी तुम्ही घरात बसला होतात. तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. कोणतीही निवडणूक कार्यकर्त्यांच्या जीवावर लढता येते आणि जिंकता येते. भाजपा-महायुतीने कार्यकर्त्यांना मोठे केले, त्यांना संधी दिली. त्यामुळे ही घरकोंबड्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



संकटमोचक काय करणार आहेत, हे विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊतांना समजेल. संपलेल्या पक्षाला ना संकटाची भीती असते, ना संकटमोचकाची. उबाठा गट पूर्ण अस्तित्वहीन झालेला असल्याने त्यांना ना संकटाची भीती आहे, ना संकटमोचकाची. तुमची मशाल कुठेकुठे विझली आहे ते पहा. आपल्या उबाठाची कचराकुंडी झालेली आहे, त्याकडे राऊतांनी पहावे. महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर सर्वात जास्त उद्योगपतींना तिकीट देण्याचे काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केले. विधान परिषदेची आणि राज्यसभेची यादी वाचून दाखवली तर तुम्ही कुठल्याकुठल्या उद्योगपतींना कसे कसे तिकीट दिले होते, हे महाराष्ट्राने पाहिले असल्याचे बन यांनी सुनावले.



नवनात बन पुढे म्हणाले, 2029 ची लोकसभा निवडणुकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि ते पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. पुढच्या दीड वर्षांत संजय राऊत हे उबाठा गट सोडून राज्यसभेसाठी राहुल गांधींच्या पाया पडून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील. उद्धव आणि आदित्य ठाकरे हे संजय राऊतांना राज्यसभेची संधी देणार नसल्याने संजय राऊत यांच्यासमोर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.बारामतीत सुरु असलेले युगेंद्र पवार यांचे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही तर हा युगेंद्र पवार विरुद्ध रोहित पवार असा हा सामना आहे. दोन-चार दिवसांपासून रोहित पवार महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. मग रोहित पवारांचा गट पुढे चालला आहे म्हणून आज युगेंद्र पवार आपली वेगळी चूल मांडत आंदोलनाचा प्रयत्न करत आहेत. हा लढा महागाईच्या विरोधात नाही, तर शरद पवार यांचे वारसदार रोहित पवार आहेत की युगेंद्र पवार यासाठी सुरू आहे, असे नवनाथ बन म्हणाले.ममता बॅनर्जींचा पक्ष भाजपाने फोडला नाही तर ममता बॅनर्जीं, अभिजीत बॅनर्जींची दादागिरी झुगारून तिथल्या आमदारांनी स्वतःला स्वतंत्र करून घेतले असल्याचे सांगून नवनाथ बन म्हणाले, आता पश्चिम बंगाल दहशतमुक्त राज्य झाले आहे. या आमदारांनी त्यांचा स्वतंत्र गट केलेला आहे. आता ना ममतादीदींची दहशत राहिली, ना त्यांच्या भाच्याची. ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला, त्यांच्या अहंकाराचा गड हा पश्चिम बंगालच्या जनतेने उध्वस्त केला आहे. त्यामुळे आजपर्यंत दहशतीत राहणाऱ्या आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे आणि ते स्वतंत्रपणे आपले धोरण आणि विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे