Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘वन प्लॅटफॉर्म’ यंत्रणा , गर्दी, वाहतूक अन् सुरक्षेचे होणार रिअल टाइम व्यवस्थापन

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Nashik Simhastha Kumbh Mela) दरम्यान कोट्यवधी भाविकांचे आगमन अपेक्षित असल्याने गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पावले उचलली आहेत. यासाठी विविध विभागांना एका एकात्मिक डिजिटल व्यासपीठावर आणण्याचे नियोजन करण्यात येत असून, यासंदर्भात बुधवारी आंतरविभागीय समन्वय बैठक पार पडली.


बैठकीस विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri ) , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad०, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नाशिक शहर पोलीस, नाशिक ग्रामीण पोलीस, नाशिक परिक्षेत्र पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस, नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, आयआयएम नागपूर, ईवाय मोबिलिटी टीम, पीडब्ल्यूसी टीम तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी सहभागी झाले.



धार्मिक सोहळ्यात विविध यंत्रणांमधील समन्वय महत्त्वाचा


सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात विविध यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. याच पार्श्वभूमीवर गर्दीचा अंदाज, भाविकांची हालचाल, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा निरीक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद या सर्व बाबींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पीडब्ल्यूसीकडून प्रस्तावित तंत्रज्ञान आराखडा आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.बैठकीत साधुग्राम नियोजन, घाट व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था, मंगल कार्यालये व इतर सुविधांचे नियोजन, पोलीस दलाची तयारी, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी या विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.(Nashik Simhastha Kumbh Mela News)



एकात्मिक पद्धतीने काम करणे आवश्यक


कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, “सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेता प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे नव्हे, तर एकात्मिक पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. रिअल टाइम माहिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागांमधील समन्वय यामुळे गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा आणि भाविकांना सुविधा पुरविणे अधिक प्रभावी होईल. त्यादृष्टीने सक्षम आणि भविष्यातील गरजा लक्षात घेणारी यंत्रणा उभारण्यावर भर आहे.”

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला