Monday, August 31, 2026

Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरे वादाच्या भोवऱ्यात; आक्षेपार्ह व्हिडीओवर माफी, म्हणाला- ती चूक झाली

Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरे वादाच्या भोवऱ्यात; आक्षेपार्ह व्हिडीओवर माफी, म्हणाला- ती चूक झाली

Pranit More Controversy : बिग बॉस 19 चा स्पर्धक आणि प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे वादात सापडला आहे. एका क्राउडवर्क शो (Crowdwork Show) दरम्यान प्रेक्षकाने महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर प्रणित हसताना दिसला. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका होत आहेत. नेटकऱ्यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केल्या, तर अनेक इन्फ्लुएन्सर्सनीही या प्रकारच्या घटनेवर नाराजी व्यक्त केली. हा वाद वाढताच प्रणित मोरेने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे जाहीर माफी मागीतली.

संबंधित क्लिपमध्ये एका प्रेक्षकाने डेटिंगच्या अनुभवा बदल सांगताना महिलांबाबात वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यावेळी अश्या व्यक्तव्याच प्रणितही हसताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला. यानंतर आता प्रणितने या प्रकरणा संदर्भात इनस्टा स्टोरी टाकत माफी मागीतली आहे.

प्रणीतची इनस्टा स्टोरी चर्चेत

इनस्टा दवारे स्टोरी टाकत प्रणित म्हणाला की, त्या प्रेक्षकाचे मत माझे मत नव्हते. मात्र, त्या क्षणी हसण्याऐवजी मला ती टिप्पणी त्वरित थांबवायला हवी होती. ती माझी चूक होती आणि त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. त्याने पुढे स्पष्ट केले की, हा व्हिडीओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल आहे. पुढे बोलताना तो म्हणाला, मी एक सामान्य माणूस आहे आणि चुकांमधून शिकत असतो. भविष्यात अशा प्रसंगांना अधिक जबाबदारीने हाताळण्याचा प्रयत्न करेन.

दरम्यान, व्हिडीओ हटवण्यात आला असला तरी त्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर अजूनही जोरदार व्हायरल होत आहेत. महिलांबाबत आक्षेपार्ह मानसिकतेला प्रोत्साहन मिळू नये, अशी भूमिका अनेकांनी घेऊ नये अश्या प्रकारची चर्चा सध्या सोशल मिडीयवर सुरूच आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >