Thursday, October 15, 2026

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

या शोमध्ये सलमान आणि करिश्माला पाहून चाहतांना भरपूर आनंद झाला आहे. 

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या नव्या पर्वात उजाळा मिळाला. ‘दुल्हन हम ले जाएंगे’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करिश्माच्या एका ड्रेसवरून सलमानने आक्षेप घेतला होता. हा किस्सा करिश्माने कार्यक्रमात सांगितला. सलमान आणि करिश्मा ही ९०च्या दशकातील सुप्रसिद्ध जोडी म्हणून ओळखली जाते. या शोमध्ये सलमान आणि करिश्माला पाहून चाहतांना भरपूर आनंद झाला आहे.

ड्रेसवरून सलमानने केला होता विरोध

दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाच्या नवव्या आणि अंतिम पर्वात अभिनेता सलमान खान पहिला पाहुणा म्हणून सहभागी झाला. यावेळी करिश्मा कपूरसोबतच्या जुन्या आठवणींवरही चर्चा झाली. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये अनेकदा वाद होत असल्याचे करिश्माने सांगितले.

करिश्माने सांगितले की, ‘दुल्हन हम ले जाएंगे’ चित्रपटातील एका ड्रेसबाबत ती खूप उत्साही होती. मात्र, सलमानला तिचा तो पोशाख आवडला नव्हता. त्याने ड्रेसवर आक्षेप घेतल्यामुळे करिश्माला दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याकडे तक्रार करावी लागली होती.

करण जोहरने सलमानला त्या ड्रेसच्या बोल्ड लूकमुळे अडचण होती का, असे विचारले. त्यावर करिश्माने होकार दिला. तिच्या म्हणण्यानुसार, तो ड्रेस खूप उघडा आणि अंगाला घट्ट बसणारा होता.

यावर सलमानने आपली बाजू मांडली. त्याच्या मते, तो ड्रेस खूपच तोकडा आणि पारदर्शक होता. प्रत्येक टेकच्या आधी तो करिश्माला ड्रेस खाली ओढण्यास सांगत असे, असेही त्याने सांगितले. या जुन्या आठवणींमुळे कार्यक्रमात रंगत आली.

‘दुल्हन हम ले जाएंगे’ चित्रपटाची कथा काय?

‘दुल्हन हम ले जाएंगे’ हा 2000 मध्ये प्रदर्शित झालेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात सलमान खानने राजा ओबेरॉय, तर करिश्मा कपूरने सपनाची भूमिका साकारली होती.

राजा सपनाच्या प्रेमात पडतो; मात्र तिच्या तीन काकांच्या वेगवेगळ्या अपेक्षांमुळे त्याला लग्नासाठी त्यांची मनधरणी करावी लागते, अशी या चित्रपटाची कथा आहे. परेश रावल, ओम पुरी आणि अनुपम खेर यांनी सपनाच्या काकांच्या भूमिका साकारल्या होत्या.

सलमान आणि करिश्मा यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली होती. ‘जुडवा’, ‘बीवी नं. 1’ आणि ‘चल मेरे भाई’ यांसारख्या चित्रपटांमध्येही ही जोडी एकत्र दिसली होती. त्यामुळे ‘कॉफी विथ करण’मधील त्यांच्या जुन्या आठवणींनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >