Pahlaj Nihalani Passes Away : प्रसिध्द निर्माते पहलाज निहलानी यांचे निधन; हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा




Pahlaj Nihalani Passes Away : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी (Pahlaj Nihalani) यांचे मुंबईत निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. (Bollywood News)


१९८० आणि १९९० च्या दशकात पहलाज निहलानी यांनी अनेक लोकप्रिय आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. गुनांहो का फैसला, पाप की दुनिया, मिट्टी और सोना, सोला और शबनम आणि ऑंखे यांसारखे चित्रपट त्यांच्या निर्मिती संस्थेने प्रेक्षकांसमोर आणले होते.पहलाज यांच्या निधनानंतर अनेक अभिनेते आणि कलाकारांनी सोशल मीडियावर श्रध्दांजली वाहली आहे.





महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर श्रध्दांजली वाहली आहे. त्यांनी चित्रपटविश्वातील एक अनुभवी व्यक्तिमत्त्व हरवले आहे, अश्या दु:खद शब्दांत आपली भावना व्यक्त केली आहे.



१९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या इल्जाम या चित्रपटातून गोविंद यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे निर्माते पहलाज निहलानी होते. त्यानंतरही गोविंदाच्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे गोविंदाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात निहलानी यांचे मोठे योगदान मानले जाते.


चित्रपट निर्मितीबरोबरच त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात सेन्सॉरशिप आणि चित्रपट प्रमाणनाशी संबंधित अनेक निर्णय चर्चेचा विषय ठरले होते. कठोर भूमिका आणि स्पष्ट मतांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.


त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीने एक अनुभवी निर्माता आणि महत्त्वाचा प्रशासक गमावला आहे.





Comments
Add Comment

3 Idiots Sequel : '3 इडियट्स'चे त्रिकुट परतणार; राजकुमार हिरानींचे संकेत

मुंबई : आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांची मुख्य भूमिका असलेला २००९ मधील सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'च्या

Jailer 2 release date : ‘जेलर २’ चित्रपट १५ ऑक्टोबरलाच होणार रिलीज; पुढे ढकलण्याच्या अफवांवर निर्मात्यांचा पूर्णविराम

सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांच्या बहुप्रतिक्षीत ‘जेलर २’ (Jailer 2) या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत गेल्या काही

Nikki Arbaz Breakup : निक्की तांबोळी-अरबाज पटेलचा ब्रेकअप? अखेर सगळं सत्य समोर

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या 5 व्या सीझनमध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या नात्याची जोरदार चर्चा झाली

Janhavi Killekar New Brand : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सुरू केला नवा प्रवास; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

मुंबई : जान्हवी किल्लेकरच्या चाहत्यांसाठी खास बातमी! ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आता

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच