Ritesh Deshmukh : "महाराजांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता"; व्हायरल व्हिडीओनंतर रितेश देशमुखचे स्पष्टीकरण, ट्रोलर्सना दिले चोख उत्तर

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवत नवा इतिहास रचला आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी रितेशने संपूर्ण कलाकार आणि तांत्रिक टीमसाठी एका खास सेलिब्रेशन पार्टीचे आयोजन केले होते. मात्र, या पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रितेश देशमुख वादाच्या भोवऱ्यात सापडला. (Ritesh Deshmukh)



नेमकं प्रकरण काय ?


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रितेश 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टी-शर्ट परिधान करून पार्टीत नृत्य करताना दिसत होता. या टी-शर्टवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असल्याने काही नेटकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेत रितेशवर टीका केली. सोशल मीडियावर त्याच्यावर ट्रोलिंगचा भडिमार सुरू झाल्यानंतर अखेर रितेश देशमुखने अधिकृत निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Ritesh Deshmukh)



अवमान करण्याचा किंचितही हेतू नव्हता :


रितेश देशमुखने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "'राजा शिवाजी' चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या आनंदात आमच्या टीमने एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमातील माझा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एक शिवप्रेमी आणि जबाबदार कलाकार म्हणून याबाबत स्पष्टीकरण देणे माझे कर्तव्य आहे." (Ritesh Deshmukh)


तो पुढे म्हणाला, "छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट घालून आनंदोत्सव साजरा करण्यामागे महाराजांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता. हा टी-शर्ट मी चित्रपटाच्या प्रचार मोहिमेदरम्यान नियमित वापरत होतो. त्या दिवशीही प्रचाराचे काम पूर्ण करून थेट कार्यक्रमाला गेलो असल्यामुळे टी-शर्ट बदलणे राहून गेले." (Ritesh Deshmukh)



मद्यपानाच्या आरोपांवरही दिले स्पष्टीकरण :


व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर रितेश देशमुखने मद्यपान केल्याचे दावेही करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना रितेशने स्पष्ट शब्दांत म्हटले, "मी आजवर कधीही मद्यपान केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. त्यामुळे माझ्याबाबत करण्यात येणारे असे दावे पूर्णपणे चुकीचे आणि तथ्यहीन आहेत." त्याने असेही नमूद केले की, व्हिडीओ चित्रीत करणाऱ्या व्यक्तीला संबंधित कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले नव्हते. (Ritesh Deshmukh)



भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो :


रितेशने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, हा कार्यक्रम 'राजा शिवाजी' चित्रपटासाठी गेली साडेतीन वर्षे अथक परिश्रम घेणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र, आपल्या कृतीमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल तो मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. (Ritesh Deshmukh)



छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मनात अपार आदर :


पोस्टच्या शेवटी रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करत म्हटले, "छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे, प्रेरणेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात अपार आदर, प्रेम आणि निष्ठा आहे. ही भावना कायम राहील. जय शिवराय."


रितेशच्या या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधाण आले असून अनेकांनी त्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे, तर काही जणांनी आपली नाराजी कायम ठेवली आहे. (Ritesh Deshmukh)

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’