Ashadhi Ekadashi Wari : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; ७ जुलैला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू (Dehu) यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक (Timetable) जाहीर केले आहे. ज्येष्ठ वद्य सप्तमी, ७ जुलै रोजी मुख्य देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यानिमित्ताने देहूनगरीत तयारीला वेग आला असून वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.


प्रस्थानाच्या दिवशी म्हणजे ७ जुलै रोजी पालखीचा विसावा इनामदार वाड्यात असेल. त्यानंतर ८ जुलै रोजी पालखी इनामदार वाड्यातून मार्गस्थ होईल. यावेळी मानाची पहिली आरती सूफी संत अनगडशा बाबा यांच्या दर्ग्यात पार पडणार असून त्यानंतर पालखी पंढरपूरच्या (Pandharpur)दिशेने पुढील प्रवास सुरू करेल.



संस्थानाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांची प्रमुख विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच पालखीच्या रथासाठी नवीन व्यवस्था करण्यात येत असून रथ ओढण्यासाठी तीन नवीन बैलजोड्या खरेदी करून त्यांना रथास जोडण्यात येणार आहे.


संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक


७ जुलै: मंगळवार- पालखी प्रस्थान सोहळा (देहू)
८ जुलै: बुधवार- इनामदार साहेब वाडा
९ जुलै: गुरुवार- आकुर्डी (श्री विठ्ठल मंदिर)
१० जुलै: शुक्रवार- श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर
११ जुलै: शनिवार- श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नानापेठ (पुणे)
१२ जुलै: रविवार- लोणी काळभोर, कदम वाक वस्ती (नवीन पालखी तळ)
१३ जुलै: सोमवार- यवत (भैरवनाथ मंदिर)
१४ जुलै: मंगळवार- वरवंड (विठ्ठल मंदिर)
१५ जुलै: बुधवार- उंडवडी गवळ्याची
१६ जुलै: गुरुवार- बारामती, शारदा विद्यालय प्रांगण
१७ जुलै: शुक्रवार- सणसर (पालखी तळ)
१८ जुलै: शनिवार- निमगाव केतकी (पालखी तळ)
१९ जुलै: रविवार- इंदापूर (पालखी तळ)
२० जुलै: सोमवार- सराटी पालखी तळ (निरा स्नान)
२१ जुलै: मंगळवार- आकलूज
२२ जुलै: बुधवार- बोरगाव श्रीपूर
२३ जुलै: गुरुवार- पिराची कुरोली
२४ जुलै: शुक्रवार- वाखरी
२५ ते २८ जुलै: - पंढरपूर मुक्काम व आषाढी एकादशी सोहळा
२९ जुलै: बुधवार- पालखीचा देहूकडे परतीचा प्रवास



महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे. आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) निमित्ताने देहू, आळंदीसह राज्यातील विविध भागांतून पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. विठ्ठल भक्ती, समता, बंधुभाव आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात दरवर्षी लाखो वारकरी सहभागी होतात. त्यामुळे यंदाच्या वारीकडेही राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी