Adani : अदानींची दिवसाला १८९७ कोटी कमविले तर अंबानींनी १३५२ कोटी गमविले

मुंबई : ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’च्या ताज्या अहवालानुसार, या वर्षात जानेवारी महिन्यापासून ते ४ जून २०२६ पर्यंत भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदाणी यांच्या संपत्तीत तब्बल ३०.७ अब्ज डॉलर्सची बंपर वाढ झाली आहे. गौतम अदाणी यांच्या संपत्ती झालेली वाढ तर लक्षणीय आहेच, पण दररोज सरासरी १८९७ कोटी रुपयांची कमाई करत त्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. याउलट, हाच काळ मुकेश अंबानी यांच्यासाठी अत्यंत कठीण ठरला असून त्यांना या वर्षात आतापर्यंत त्यांचे २१.९ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे, म्हणजेच त्यांनी दररोज सरासरी १३५२ कोटी रुपये गमावले आहेत.रोजच्या कमाईच्या जोरावर गौतम अदाणी यांनी पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान पटकावला आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदाणी आता १९व्या स्थानावर पोहोचले आहेत. तर मुकेश अंबानी त्यांच्यापेक्षा एक पायरी खाली घसरून २०व्या क्रमांकावर आले आहेत. जून २०२६ च्या ताज्या अहवालानुसार, अदाणी पोर्टफोलिओचा ऑपरेटिंग प्रॉफिट ९४,८३४ कोटी रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. अदाणी ग्रुपने पायाभूत सुविधा आणि ग्रीन एनर्जी या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, समूहाची वार्षिक गुंतवणूक १.५३ लाख कोटी रुपये आहे. ही गुंतवणूक कोणत्याही भारतीय कंपनीच्या तुलनेत सर्वाधिक आहे.




मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण होण्यामागे जागतिक घडामोडी कारणीभूत ठरल्या आहेत. अंबानी यांच्या कमाईचा एक मोठा हिस्सा रिलायन्स इंडस्ट्रीजमधून येतो, ही कंपनी जगातील सर्वात मोठा ऑइल रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवते. परंतु, सध्या मध्य पूर्व आशियामध्ये सुरू असलेल्या वाढत्या तणावामुळे रिलायन्सच्या या मुख्य तेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. या जागतिक अस्थिरतेमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार रिलायन्ससारख्या मोठ्या निफ्टी-वेटेज असलेल्या कंपनीमधून आपले पैसे काढून इतर सुरक्षित शेअर बाजारांकडे वळवत आहेत. यामुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

Thane Fire News : ठाणे हादरले! दिवा-शिल रोडवरील व्यावसायिक संकुलात भीषण आग; चार गोदामे जळून खाक, मोठी जीवितहानी टळली

ठाणे : ठाण्यातील दिवा-शिल रोड परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि खळबळजनक आगीची घटना घडली. एका

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी