Delhi University Professor Murder Case : दिल्लीत महिला प्राध्यापिकेची हत्या; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह, तपास सुरू

दिल्ली : दिल्लीतील एका महाविद्यालयीन प्राध्यापिकेच्या हत्येने (Delhi Professor Murder) राजधानीत खळबळ उडाली आहे. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शिवाजी कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या ४९ वर्षीय सहायक प्राध्यापिका देवोस्मिता पॉल (Debosmita Paul ) यांचा मृतदेह गुरुवारी पूर्व दिल्लीतील वसुंधरा एन्क्लेव्ह येथील त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Delhi Crime News)


मिळालेल्या माहितीनुसार, देवोस्मिता पॉल या वसुंधरा एन्क्लेव्ह परिसरातील एका फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. गुरुवारी दुपारी सुमारे २.३५ वाजता पोलिसांना एका महिलेने फोन करून तिच्या बहिणीचा मृतदेह घरात आढळल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.


फोन करणाऱ्या देवराती पॉल यांनी पोलिसांना सांगितले की, सकाळपासून त्या बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, वारंवार फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांना संशय आला. फ्लॅटच्या बाहेर कुलूप असल्याचे दिसून आले. काहीतरी अघटित घडल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी देवोस्मिता पॉल या घरात मृतावस्थेत पडलेल्या आढळल्या.


घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घराची सखोल तपासणी करण्यात आली असून घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे आणि नमुने गोळा करण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण परिसराचे छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.


प्राध्यापिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अनेक पथके तयार केली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, पीडितेचे अलीकडील संपर्क आणि हालचालींची तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि