Dattatray Bharne MahaDBT Portal : महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरण; शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावेत : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

महाडीबीटी पोर्टलवरून बियाणे वितरणाचा अभिनव उपक्रम.


मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे (Kharif Seeds) आता महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.


राज्यात यंदा खरीप हंगाम प्रमाणित बियाणे व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भूईमुग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसेच या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात तब्बल २ लाख प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, आधुनिक कृषी पद्धती आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे.



योजनेअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ३ लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये ६६ हजार ७५० क्विंटल सोयाबीन तसेच ३५ हजार ५०० क्विंटल भूईमूग बियाण्यांचा समावेश असून इतर खरीप पिकांची बियाणेदेखील महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध राहणार आहेत.


यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, "राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवरून बियाणे वितरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे बियाणे वाटप प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सुलभता आणि वेग येणार आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही प्रतीक्षा न करता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा."



ते पुढे म्हणाले, "खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवस्थेच्या माध्यमातून कृषी सेवा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन खरीप हंगामाची तयारी वेळेत पूर्ण करावी."


महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर जाऊन “बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते” या टाईलअंतर्गत अर्ज करावेत. अर्ज प्रक्रियेसाठी Agristack Farmer ID असणे आवश्यक आहे.



तसेच जास्तीत जास्त शेतकरी गटांनी पीक प्रात्यक्षिके या घटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. प्रात्यक्षिके व बियाण्यांच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला