Nashik : अखेर नाशिकच्या 'त्या' सहा कोटींच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात, उद्योजकांसह कामगारांना दिलासा

Nashik : अंबड औद्योगिक वसाहतीत जाणारा मुख्य रस्ता तसेच परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी मंजूर झालेल्या सुमारे सहा कोटी रुपयांच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने उद्योजकांसह कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र चर्चेत आलेल्या कथित टक्केवारीच्या वादात हे काम अडकले होते. कथित टक्केवारीच्या कारणावरून एका लोकप्रतिनिधीने संबंधित ठेकेदारावर दबाव आणून काम बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोप प्रभागातील दुसऱ्या एका लोकप्रतिनिधीकडून करण्यात आला होता. त्यामुळे कामगार वसाहतीतील महत्त्वाचे विकासकाम अडवणारा तो लोकप्रतिनिधी कोण, याबाबत सिडको परिसरात जोरदार चर्चा रंगली होती. या कामासाठी प्रभागाच्या नगरसेवकांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन कामाबाबत माहिती दिली होती.



सहा कोटी रुपयांची तरतूद


एमआयडीसीतील फ्रेश बेकरी व लगतच्या परिसरातील रस्त्यांची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय झाली होती. खड्डेमय रस्त्यांमुळे उद्योजक, कामगार आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची दखल घेत उद्योजकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच आमदार सीमा हिरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत आणि शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता.त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.


महापालिकेमार्फत या कामाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून काही दिवसांपूर्वी भुयारी गटार व काँक्रिटीकरणाच्या पूर्वतयारीची कामे हाती घेण्यात आली होती. यावेळी काही लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. मात्र एका बड्या लोकप्रतिनिधीने, “प्रथम भेट घ्या, त्यानंतरच काम सुरू करा,” असे सांगत काम थांबविण्याचे निर्देश दिल्याचा आरोप करण्यात आला होता.अखेर या कामाला प्रारंभ झाला असून लवकरच दर्जेदार रस्ता तयार होणार असल्याने उद्योजक, कामगार आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण