वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून, पोलिसांकडून तपास सुरु

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)च्या मुलांच्या वसतिगृहात (ITI Hostel ) राहणाऱ्या एका विद्यार्थ्याची हत्या (Students Murder) करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्याचे नाव सौरभ संतोष साखरे (वय २३) असे आहे. तो आयटीआयच्या वसतिगृहात राहत होता. उन्हाळ्यामुळे रात्री उकाडा वाढल्याने सौरभ वसतिगृहाच्या टेरेसवर झोपला होता. याच ठिकाणी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


या प्रकरणी ऋषिकेश लक्ष्मण बढेकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, अमय भिका कोकरे (वय १९) याने जुन्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचा आरोप आहे. यापूर्वी झालेल्या भांडणातून आणि इतर वादातून निर्माण झालेल्या रागातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



पोलिसांच्या माहितीनुसार, ४ जूनच्या रात्री ते ५ जूनच्या पहाटे दरम्यान आरोपीने लोखंडी पाइप आणि सिमेंटच्या गट्ट्याने सौरभच्या डोक्यावर वार केले. या गंभीर हल्ल्यात सौरभचा जागीच मृत्यू झाला. सौरभचा मृतदेह पाहून वसतिगृहात एकच खळबळ उडाली. घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.


या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वसतिगृहात घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून हत्येमागील नेमके कारण आणि इतर शक्य तितक्या बाबींचा तपास केला जात आहे.


Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने