Zakir Naik : 'त्या' महिलांना दाखवले झाकीर नाईकचे व्हिडीओ, TCS मधील धक्कादायक प्रकार

 मुंबई : नोकरीच्या ठिकाणी दबाव टाकून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी टीसीएसच्या नाशिक कार्यालयात कॉर्पोरेट जिहाद सुरू होता. या कॉर्पोरेट जिहादशी संबंधित नवनवी माहिती आता समोर येत आहे. धर्मांतर करण्यासाठी नाशिकच्या टीसीएसमध्ये महिला आणि पुरुषांचे विविध पद्धतीने शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण सुरू होते. या प्रकरणी एका पुरुषाने आणि काही महिलांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. या तक्रारींच्या आधारेच तपास सुरू असताना नवनवी माहिती उजेडात येऊ लागली आहे.टीसीएसमध्ये झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवून धर्मांतर करण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात होता. ही बाब समोर येताच तपास यंत्रणा सतर्क झाली आहे. झाकीर नाईकवर भारतात बंदी आहे. तो धर्मप्रसाराच्या नावाखाली देशविरोधी कारवायांसाठी चिथावणी देत असल्याचा संशय आहे. यामुळेच तपास यंत्रणा बारकाईने तपास करत आहे.कार्यालयातील महिलांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराचे गंभीर प्रकरण तक्रारीनंतर समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी ८ संशयितांवर ९ गुन्हे दाखल केले असून, न्यायालयामध्ये २ हजार पानांपेक्षा मोठे आरोपपत्र दाखल केले आहे.पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात एका पीडितेचा हादरवणारा जबाब आहे. या जबाबातून झाकीर नाईकचे नाव पुढे आले आहे.



पीडितेचा धक्कादायक जबाब :


दानिश आणि मी आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करायचो.त्या नंतर आमच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. तो माझ्यासोबत लग्न करेल की नाही याची मला सतत भीती होती. लग्नाचा विषय काढला कि तो चिडायचा. आमच्या लग्नाला माझ्या घरून संमती मिळेल का ही पण एक शंका माझ्या मनात होती. तो अनेकदा म्हणायचा, "तू डर मत मुझपे भरोसा रख, अपने साथ अल्ला है! तू ना एक काम कर तू तुझा हिंदू धर्म बाजूला ठेव आणि माझा मुस्लिम धर्म स्वीकार. आमच्या धर्मात सर्व गोष्टी करू शकतेस तुला कोणाला घाबरण्याची आवश्यकता नाही. काही चूक झाली तर अल्ला आहे अन अल्ला तुला माफ करून टाकेल.जो तेरा मेंटल स्ट्रेस है, वह कम हो जायेगा!" असे सांगून त्याने मला तजबी वाचण्यास सांगितले.त्याने मला सांगितले कि या संपूर्ण जगात फक्त अल्ला एकच आहे. तो म्हणाला कि तुम्हारे भगवान को तो सिर्फ हिंदुस्तान मे ही मानते हे पर हमारे अल्ला को दुनिया के कई देशो मे माना जाता हे ओर एक दिन ऐसा आयेगा कि पुरी दुनिया बस अल्ला की दुवा करेगी.हळूहळू त्याच म्हणणं मला पटू लागलं. त्यानेच मला मौलाना तारिकचे व्हिडीओ बघायला आणि ऐकायला सांगितले. तुला जर आणखी काही मदत लागत असल्यास तौशिफ आणि निदा खान देखील संपूर्ण मदत करतील.तो जे जे सांगत होता ते ते मी करत होते. त्याला माझ्या दोन्ही खात्यांची संपूर्ण माहिती होती. त्याला माझ्या मोबाईलचे पासवर्ड यूपीए पासवर्ड सर्व काही माहिती होते.तौसिफ आणि निदा हे वेळोवेळी मला इस्लाम धर्माबाबत सांगत. तौसिफने मला झाकीर नाईकचे व्हिडीओ आणि डॉ. इसरार अहमद यांचे व्हिडीओ बघायला सांगितले. इस्लाममधील शबा स्टोरी, ईब्राहिम स्टोरी, बकरी ईदची स्टोरी, जमजमचे पाणी, कुर्बाणी का देतात, कयामतचे दिवशी काय होईल, जन्नत की खुबसुरूती अशा वेगवेगळ्या विषयांची माहिती दिली.


आम्ही दोघे बाहेर फिरायला गेलो की सर्व बिल्स मी भरायचे. डीमार्ट, झुडीओ तसेच मोठ्या मॉलमध्ये आम्ही गेलो तो भरपूर खरेदी केली जायची सगळे पैसे मीच भरत होते. तो माझ्याकडे पैसे पण उधार घायचा... सुरुवातीला घेतलेले पैसे परत करत होता पण नंतर ते बंद होत गेलं. हळू हळू मी खचले... काय करावं ते सुचत नव्हतं... अशी माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली.

Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी