Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या






राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली आहे. संशयावरून आपल्या जवळच्या मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना महाराष्ट्रातील यवतमाळ (Yavatmal Murder Case) जिल्ह्यातील आहे. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.  (Friend’s Murder)








नेमकं काय घडलं ?


तेजस गायकवाड असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याच तीन मित्रांनी मिळून त्याची हत्या केली आहे.  तिघांन्ही घरात घुसून धारधार शस्त्राने तेजसच्या शरिरावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, तेसजचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला आणि घटनेचा तपास सुरु केला.










पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन इंगळे (वय २८), हर्षल उर्फ टोबू मसराम (वय २०) आणि प्रणय गुंजाळ (वय २२) या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि मृत तेजस हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सचिन उर्फ येडा राठोड या तरुणाबाबतची माहिती तेजसने दुसऱ्या गटाला दिल्याचा संशय आरोपींना होता.

याच संशयातून आरोपींनी तेजसचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे. ४ जून रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास तिघेही धारदार शस्त्रे घेऊन तेजसच्या घरात पोहोचले. घरात घुसल्यानंतर त्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तेजस गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.



अन् स्टेटसवर ठेवली 'ती' स्टोरी





या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी रोहन इंगळे याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस टाकले होते. त्यात त्याने सचिन राठोडला वाढदिवसाचे गिफ्ट लवकरच देणार असल्याचे लिहिले होते. पोलिसांच्या तपासात हे कथित 'गिफ्ट' म्हणजे तेजसची हत्या असल्याचे समोर आले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि त्याच दिवशी सायंकाळी नेर परिसरातून फरार झालेल्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. मृत तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी