Mumbai Crime : गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक

 ५ दिवसांत पावणेदोनशे धाडी, १९२ जण गजाआड; राज्यभरातील धडक मोहिमांत दोन कोटींचा मुद्देमाल जप्त


मुंबई : गुटखामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्य सरकारने 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यात बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. दि. १ जून ते ५ जून २०२६ या अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात १९५ ठिकाणी धडक धाडी टाकण्यात आल्या असून, तब्बल १९२ आरोपींना मुसक्या आवळून गजाआड करण्यात आले आहे. या धडक कारवाईत तब्बल १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल आणि वाहने जप्त केली आहेत.


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्याच्या विविध भागांत हे धाडसत्र राबवण्यात आले. यामध्ये सर्वाधिक मोठी कारवाई धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे करण्यात आली. ५ जून रोजी परांडा येथील एका गोदामावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी तब्बल १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला असून दोन जणांना जागीच अटक केली आहे.गुटख्याच्या आंतरराज्यीय तस्करीला चाप लावण्यासाठी 'एफडीए'ने पोलिसांच्या मदतीने महामार्गांवर पाळत ठेवली होती. ४ जून रोजी समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता, त्यात ६० लाख ५० हजार रुपयांचा गुटखा आढळून आला, तो वाहनासह जप्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभागातील नांदेड येथे १७ लाख ५२ हजार ४५० रुपयांचा, तर धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे २३ लाख ५० हजार रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड अंतर्गत येणाऱ्या मोशी येथे ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा माल जप्त करून चिखली पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.



कोकणात सर्वाधिक धाडी


प्रशासनाने जाहीर केलेल्या विभागवार आकडेवारीनुसार, कोकण विभागात सर्वाधिक ७९ धाडी टाकून ७८ जणांना अटक करण्यात आली. मात्र, जप्त केलेल्या मालाच्या किमतीचा विचार करता छत्रपती संभाजीनगर विभागात अवघ्या ९ धाडींमध्ये १ कोटी १५ लाख ६४ हजार ५३३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय पुणे विभागात ५२ धाडींत १५ लाखाहून अधिक, तर नाशिक विभागात ३५ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. मुंबईत ३० धाडी टाकून ३० जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण