Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या निर्बंधांच्या धमक्यांचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही. मोदी यांच्यावरही पूर्वी लावण्यात आलेले सर्व निर्बंध आता संपुष्टात आले असल्याचे सांगत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. पुतिन यांनी भारतीयांची प्रतिभा आणि त्यांचे तांत्रिक कौशल्य जगभरात प्रसिद्ध असल्याचे म्हटले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्यावरही बाष्य केले. पुतीन म्हणाले, ‘भारत नेहमीच एका सार्वभौम देशाप्रमाणे निर्णय घेतो आणि त्यावर निर्बंध लादण्याचा किंवा दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न उलटा पडू शकतो. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आपण सातत्याने चर्चा करत असतो. भारत नेहमी राष्ट्रीय हिताला प्राधान्य देतो. स्वतःसाठी काय सर्वोत्तम आहे हे ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देशाला आहे. आधुनिक आणि चांगल्या दर्जाची उत्पादने व तंत्रज्ञान निवडण्यासाठी भारत पूर्णपणे स्वतंत्र आहे’.



पुतिन 'सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम'मध्ये बोलत होते. पुतीन यांनी भारत-अमेरिका संबंधांच्या यशस्वी प्रगतीचाही उल्लेख केला आणि भारतावरील सर्व निर्बंध संपल्याचेही स्पष्ट केले. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याने अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क आणि प्रतिबंधात्मक पावले उचलली होती. पुतीन यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण आणि तांत्रिक सहकार्याचे कौतुक केले. भारतीय सशस्त्र दलाचा मोठा भाग रशियन उपकरणांनी सुसज्ज आहे. ही परंपरा सोव्हिएत युनियनच्या काळापासून आहे. भारत आणि रशियाचे तज्ज्ञ मध्यम पल्ल्याच्या 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राच्या विकासावर एकत्र काम करत आहेत, असेही पुतीन म्हणाले.

पुतिन पुढे म्हणाले, भारत-रशिया संबंध हे केवळ व्यापार किंवा खरेदी-विक्रीपुरतेच मर्यादित नाहीत, तर संयुक्त संशोधन आणि अथांग विश्वासाच्या भक्कम पायावर उभे आहेत. हे संबंध कोणत्याही राजकीय वातावरणाचे किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे गुलाम नाहीत आणि रशियाकडून भारताला देण्यात आलीली सर्व आश्वासने भविष्यातही पाळली जातील, अशी ग्वाहीही पुतिन यांनी यावेळी दिली. आम्हाला भारताला काय द्यायचे आहे आणि काय नाही, हे कोणीही सांगू शकत नाही. आम्ही आमच्या भागीदारांना दिलेली आश्वासने नेहमी पाळतो, विशेषतः भारतासारख्या विश्वासू मित्रासोबत आम्ही कायम आहोत, असे पुतिन यांनी ठामपणे सांगितले.



डोनाल्ड ट्रम्प यांचा नेतान्याहूंवर अविश्वास?

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाला तब्बल तीन महिने उलटले आहेत. युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली असल्यामुळे सध्या युद्ध सुरू नसले तरी तणाव कायम आहे. मध्य पूर्वेतील या तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या जागतिक व्यापाराला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत आणि याचाच परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. काही दिवसांपूर्वी इराण युद्धावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे प्रमुख बिन्यामिन नेतान्याहू यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची माहिती समोर आली होती. एवढेच नाही तर ‘मी नसतो तर तुम्ही तुरुंगात असता’, अशा शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांनी बिन्यामिन नेतान्याहू यांना सुनावले होते. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प आणि बिन्यामिन नेतान्याहू यांच्यातील मतभेद आणखी वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण इस्रायल हेरगिरी करत असल्याचा अमेरिकेला संशय असल्याची जागतिक राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. इस्रायलच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकी अधिकारी बर्नर फोन वापरत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या पेंटागॉनला इस्रायलकडून अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हेरगिरीची भीती वाटतेय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे