Shreyas Iyer : श्रेयस अय्यरची टीम इंडियाच्या टी२० कर्णधारपदी निवड निश्चित? कर्णधार म्हणून समोर असतील ही ३ मोठी आव्हाने

SHREYAS IYER : भारतीय क्रिकेट संघाच्या टी२० टीमचे नेतृत्व लवकरच श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला असला, तरी आता बीसीसीआय नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. सूर्यकुमार यादवचा सध्याचा खराब फॉर्म आणि वाढते वय पाहता, बीसीसीआय आता श्रेयस अय्यरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत आहे.



श्रेयस अय्यरसमोर असणारी ३ प्रमुख आव्हाने


१. संघ निवडीचे संतुलन आणि वैभव सूर्यवंशीचा समावेश: आयपीएल २०२६ मध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला टीम इंडियात स्थान देण्याची मागणी जोर धरत आहे. भारताकडे आधीच ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांसारखे अनुभवी पर्याय उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, वैभवला संघात स्थान दिल्यास त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये नेमक्या कोणत्या क्रमांकावर खेळवायचे आणि कुणाला बाहेर बसवायचे, हे समीकरण जुळवणे श्रेयससाठी मोठे आव्हान असेल.


२. प्रमुख खेळाडूंचा खराब फॉर्म: भारतीय संघातील अनेक मॅच-विनर खेळाडू सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहेत. शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचे आयपीएल २०२६ मधील प्रदर्शन फारसे आश्वासक राहिले नाही. एवढेच नव्हे तर, मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव दिसून आला आहे. हे खेळाडू जर आगामी मालिकांमध्ये लयीत आले नाहीत, तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.


३. विजयाचा वारसा टिकवण्याचे दडपण: भारतीय टी२० संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. २०२३ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताला टी२० मालिकेत एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. गेल्या १६ मालिकांपैकी १५ मालिका भारत जिंकला असून, एक मालिका बरोबरीत सुटली आहे. हा अजेय राहण्याचा लौकिक टिकवून ठेवण्याचे मोठे दडपण श्रेयस अय्यरवर असेल. जर हा रेकॉर्ड बिघडला, तर श्रेयसवर टीकेची झोड उठू शकते.

Comments
Add Comment

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन