Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा डोंगर रचत भारताने डाव घोषीत केला

न्यू चंदिगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी अफगाण गोलंदाजांची धुलाई करत पहिला डावात 8 बाद 564 धावा या टप्प्यावर घोषीत केला. कर्णधार शुभमन गिल (126) आणि केएल राहुल (100) यांच्या शतकांसह साई सुदर्शन,ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारताने हा धावांचा डोंगर उभारण्यात यश मिळवले.पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताने 3 बाद 368 केल्या होत्या. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केल्यामुळे आज भारताला ५०० धावांचा टप्पा पार करता आला. कर्णधार शुभमन गिलने शतकी खेळी साकारली.ऋषभ पंतने 81 धावांची झंझावाती खेळी केली, तर वॉशिंग्टन सुंदरने नाबाद अर्धशतक झळकावत डावाच शेवट चांग केला.



पहिल्या डावात भारतीय फलंदाजांची कामगिरी


शुभमन गिल – 126


केएल राहुल – 100


साई सुदर्शन – 81


ऋषभ पंत – 81


वॉशिंग्टन सुंदर – नाबाद 52


मानव सुथार – 28


मोहम्मद सिराज – 22


भारताने 127 षटकांत 564 धावांचा डोंगर उभारल्यानंतर डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.



अफगाणिस्तानकडून सलीम साफी चमकला


भारतीय फलंदाजांसमोर अफगाणिस्तानचे गोलंदाज संघर्ष करताना दिसले. मात्र मोहम्मद सलीम साफी याने 27 षटकांत 140 धावा देत 6 विकेट्स घेतल्या त्याने भारतासमोर एकहाती लढा दिला. झियाउर रहमान शरीफी आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवल्या. भारताने ५६४ धावांचा डोगंर उभे केले आहे. मात्र आता सर्वांची नजर भारतीय गोलंदाजांवर आहे अफगाणिस्तानचा पहिला डाव लवकर गुंडाळून त्यांच्यावर फॉलोऑन लादण्याचा प्रयत्न भारत करेल.


स्कोअर : भारत 564/8 घोषित (127 षटके)
अफगाणिस्तान – पहिला डाव सुरू.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून