IND vs AFG Test : भारत दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत ५०० च्या उंबरठ्यावर

न्यू चंदिगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना न्यू चंदिगडमधील महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत (लंच) सहा बाद ४७५ धावा केल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर १४ धावांवर आणि मानव सुथार शून्य धावांवर खेळत आहे.



याआधी पहिल्या दिवशी भारताने ८५ षटकांत ३ बाद ३६८ धावा केल्या होत्या. तिथून पुढे सुरुवात करत भारताने दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत आणखी तीन गडी गमावले आणि सहा बाद ४७५ धावा एवढी मजल मारली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात गिल, ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत हे तिघे बाद झाले.



भारताकडून आतापर्यंत यशस्वी जयस्वालने २४, केएल राहुलने १००, साई सुदर्शनने ८१, कर्णधार शुभमन गिलने १२६, ऋषभ पंतने ८१, ध्रुव जुरेलने १९ धावांचे योगदान दिले आहे. गिल आणि केएल राहुल या दोघांची शतकी खेळी तसेच साई सुदर्शन आणि ऋषभ पंतची अर्धशतकी खेळी या व्यतिरिक्त ध्रुवने झटपट काढलेल्या धावा यामुळे भारतीय संघ ५०० च्या उंबरठ्यावर आहे. अफगाणिस्तानकडून मोहम्मद सलीम साफीने चार तर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आणि झियाउर रहमान शरीफीने प्रत्येकी एक विकेट घेतली.



यशस्वी जयस्वाल ३२ चेंडूत ५ चौकारांसह २४ धावा


केएल राहुल १६५ चेंडूत ११ चौकारांसह १०० धावा


साई सुदर्शन १०४ चेंडूत १३ चौकारांसह ८१ धावा


शुभमन गिल १७७ चेंडूत १५ चौकार आणि एक षटकार मारत १२६ धावा


ऋषभ पंत १२१ चेंडूत ६ चौकार आणि तीन षटकार मारत ८१ धावा


ध्रुव जुरेल २० चेंडूत ४ चौकारांसह १९ धावा

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून