Mohmmad Siraj : टेस्ट मॅचमध्ये मिया मॅजिक! मोहम्मद सिराजच्या फलंदाजीने गौतम गंभीरही शॉक !

IND vs AFG Test: भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमधील एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला. पहिल्या डावात भारताने १२७ षटकात आठ बाद ५६४ धावा केल्या. सर्व भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली.मात्र पहिल्या डावाच्या अखेरीस चर्चेत राहिला तो म्हणजे लोअर ऑर्डरमध्ये खेळणारा मोहम्मद सिराज. सिराजने मैदानात उतरताच धावांचा पाऊस पाडला. त्याने खेळलेली वादळी खेळी पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांसह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही थक्क झाले.


टी-२० च्या स्टाईलमध्ये बॅटिंग


मोहम्मद सिराज मैदानात उतरताच त्याने कसोटी सामन्याला टी-२० चे स्वरूप दिले.गौतम गंभीरने फ्री हँड दिल्यानंतर सिराजने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली.त्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या काही चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १ खणखणीत षटकार ठोकला. सिराजने अवघ्या ११ चेंडूंत २२ धावा करून २०० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.


सलीम सफीने संपवली इनिंग


सिराजचे हे वादळ खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकले नाही.मोहम्मद सलीम सफीने टाकलेला एक चेंडू एकदम खालीच राहिला. हयाच चेंडूवर सिराज क्लीन बोल्ड झाला.बाद होण्यापूर्वी सिराजने २२ धावांची खेळी केली. या खेळीमुळे भारताला धावा वाढवण्यास मदत झाली. भारताने ५६४ धावांचा विशाल डोंगर रचत डाव घोषित केला. सिराजला मोठी धावसंख्या उभारता आली नसली,तरी सोशल मीडियावर त्याच्या फलंदाजीची जोरदार चर्चा सुरू आहे.
Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात