Share Market : शेअर बाजारात सोमवारी काय होणार ? गुंतवणूकदार चिंतेत

मुंबई : अमेरिकेतली प्रमुख शेअर बाजारांमध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. आयटी क्षेत्रातील शेअर्सच्या विक्रीमुळे मार्च २०२० ते एप्रिल २०२५ दरम्यानची मोठी घसरण दिसली. क्रिप्टो करन्सीच्या क्षेत्रातही घसरण झाली. मुंबईत सेन्सेक्स ११६.६६ ने घसरून शुक्रवारी संध्याकाळी ७४,२४३.३४ वर बंद झाला तर निफ्टी फिफ्टी इंडेक्स ४९.८५ ने घसरून शुक्रवारी संध्याकाळी २३,३६६.७० वर बंद झाला. यामुळे सोमवारी भारतासह जगभरातील शेअर बाजारांमध्ये काय होणार या चिंतेने असंख्य गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे.



गुंतवणुकीचे काय होणार हे सोमवार ८ जून २०२६ रोजी सकाळच्या सत्रातच स्पष्ट होईल. पण अनेक गुंतवणूकदार मोठी घसरण होईल आणि आपले नुकसान होईल या विचाराने आतापासूनच त्रस्त आहेत. सध्या भारतीय शेअर बाजारांमध्ये देशांतर्गत असलेली गुंतवणूक वाढत आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारावर सोमवारी मोठा परिणाम होईल की तात्पुरता परिणाम दिसेल असा प्रश्न अनेक तज्ज्ञ उपस्थित करत आहेत.याआधी शुक्रवारी अमेरिकेत डाऊ जोन्स ६९५.१५ अंकांनी घसरून ५०,८६६.७८ वर बंद झाला. नॅस्डॅक ११२१ अंकांनी म्हणजेच ४.१८ टक्क्यांनी घसरून २५,७०९.४३ वर बंद झाला. एसअँडपी फाईव्ह हंड्रेड इंडेक्स २००.५७ अंकांनी म्हणजेच २.६४ टक्क्यांनी घसरून ७३८३.७४ वर बंद झाला. सेमीकंडक्टर म्हणजेच चिप उत्पादक कंपन्या, एआय सेवा देणाऱ्या तसेच एआयची मोठ्या प्रमाणात मदत घेणाऱ्या कंपन्या आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. आता सोमवारी काय होणार याकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.