Vaibhav Sooryvanshi : वैभवमुळे बीसीसीआयने आपला नियम बदलला! सचिन तेंडुलकरप्रमाणे बेबी बॉसला दिली विशेष परवानगी

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी तुफान फटकेबाजी करून अनेकांचे लक्ष वेधून घेणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (१५ वर्षे) पुन्हा चर्चेत आला आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी (६ जून) युरोप दौरा आणि आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा टी२० संघ जाहीर केला.या दोन्ही संघात वैभवला संधी देण्यात आली आहे.त्याला लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या प्रचंड यश आणि प्रसिद्धीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफसोबत दोन विशेष व्यक्ती प्रवास करणार आहेत.



वैभवसाठी बीसीसीआयची मोठी घोषणा


वयाच्या १५ व्या वर्षी भारतीय संघात निवड झालेल्या वैभवसाठी अचानक मिळालेली प्रसिद्धी,माध्यमांचे लक्ष आणि वरिष्ठ संघाचा प्रचंड दबाव हाताळणे हे आव्हानात्मक ठरू शकते.यामुळे बीसीसीआयने इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत वैभवच्या आई-वडिलांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. विदेश दौऱ्यावर त्याच्या पालकांच्या उपस्थितीमुळे वैभवला एकटेपणा जाणवणार नाही आणि त्याला घरासारखे वातावरण मिळेल. तसेच त्याला नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात मदत होईल यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.



सचिननंतर वैभवसाठी बीसीसीआयची विशेष परवानगी


जेव्हा सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.त्यावेळी सचिन केवळ १६ वर्षांचा होता, त्यामुळे त्याच मोठा भाऊ अजित त्याच्या सोबत पाकिस्तानला गेला होता. आता बीसीसीआयने वैभवच्या बाबतीतही हा निर्णय घेतला आहे. मंडळाचे सचिव देवजित सैकिया म्हणाले, तो एक लहान मुलगा आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या आई-वडिलांना त्याच्यासोबत आयर्लंड आणि इंग्लंडला प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या आधीच बीसीसीआयने काही कडक नियम जाहीर केले होते. बीसीसीआयने विदेश दौऱ्यासाठी खेळाडू आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी कठोर नियमांची घोषणा केली होती.ज्यामध्ये खेळाडू संपूर्ण दौऱ्यात आपल्या कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत राहू शकणार नव्हते. जर एखाली मालिका किंवा स्पर्धा ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ असली तर खेळाडूंचे कुटुंब केवळ १४ दिवसच सोबत राहू शकते, असाही नियम करण्यात आला होता. पण वैभवच्या वयाचा विचार करून बीसीसीआयने फक्त त्याच्यासाठी नियमात अपवाद केला आहे.



वैभवची निवड होताच त्याने विक्रम केला


वैभव सूर्यवंशी भारतीय संघात निवड झालेला सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याची वयाच्या १५ वर्षे आणि ७१ दिवसांतच संघात निवड झाली आहे. सचिनची वयाच्या १६ वर्षे आणि १९४ दिवसांत संघात निवड झाली होती. त्याने आपल्या पहिल्याच दौऱ्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. जर वैभवला निवड झालेल्या दौऱ्यात अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरूण भारतीय क्रिकेटपटू ठरेल.

Comments
Add Comment

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या