बीडमधील अजब प्रकार, अधिक महिन्याचं वाण थेट मांजराच्या पोटात




बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील टाकरवण परिसरातील एका गावात अधिक मासानिमित्त घडलेल्या एका अनोख्या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. जावयासाठी खास तयार करण्यात आलेली ५ ग्रॅम सोन्याची अंगठी घरातील मांजराने गिळल्याने संपूर्ण कुटुंबाची धावपळ उडाली. अखेर मांजराच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे अंगठी बाहेर काढण्यात आली.









मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासातील धोंडे जेवणासाठी सासरच्या मंडळींनी लेक आणि जावयाला घरी बोलावले होते. जावयाला खास भेट देण्यासाठी सासूबाईंनी ५ ग्रॅम सोन्याची अंगठी पिठाच्या धोंड्यात लपवून ठेवली होती. मात्र पाहुणचार आणि गप्पांच्या गडबडीत घरातील मांजराने तो धोंडा खाऊन टाकला.



हा प्रकार लक्षात येताच घरात एकच गोंधळ उडाला. मांजराला तातडीने पकडून बांधून ठेवण्यात आले. अंगठी पुन्हा मिळेल या आशेने कुटुंबीयांनी काही दिवस मांजरावर लक्ष ठेवले. दरम्यान, जावयाला संपूर्ण प्रकार सांगून कपड्यांचा आहेर देण्यात आला आणि अंगठी नंतर देण्याचे आश्वासन देण्यात आले.


चार दिवस उलटल्यानंतरही अंगठी मिळाली नाही. त्यामुळे मांजराला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करून अंगठी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारादरम्यान मांजराचा मृत्यू झाला.


यानंतर डॉक्टरांनी मृत मांजराच्या पोटाची तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याची अंगठी आढळून आली. अखेर अंगठी परत मिळाली, मात्र त्यासाठी मांजराचा जीव गेला. या विचित्र घटनेची परिसरात मोठी चर्चा रंगली असून जावयासाठी ठेवलेला सोन्याचा आहेर आणि मांजराची ही कहाणी अनेकांना आश्चर्यचकित करत आहे.







Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा