Satara Suicide : WhatsApp स्टेटसमुळे वाचले महिला पोलिसाचे प्राण; नेमकं काय घडलं?















सातारा  : सातारा जिल्ह्यातील वडूज येथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने (Women Police Constable) आत्महत्येचा (Attempt to Suicide) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, तिच्या सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून संबंधित महिलेचे प्राण वाचले आहेत. (Satara News)


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर 'गुड बाय ऑल ऑफ यु' असा स्टेटस ठेवला होता. हा संदेश पाहिल्यानंतर तिच्या सहकारी पोलिसांना संशय आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी तातडीने तिच्या राहत्या ठिकाणी धाव घेतली.



सहकारी तिच्या खोलीवर पोहोचले तेव्हा ती गळफास घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. तातडीने हस्तक्षेप करून सहकाऱ्यांनी तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.


प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचाऱ्याने वडूज पोलीस ठाण्यातीलच एका पोलीस कर्मचाऱ्यावर लग्नाचे आश्वासन देऊन नंतर नकार दिल्याचा आरोप केला आहे. या कारणामुळे ती मानसिक तणावाखाली होती, असे समोर आले आहे. समाजात बदनामी होण्याच्या भीतीमुळे आपण टोकाचा निर्णय घेण्याचा विचार केला होता, असेही तिने सांगितल्याची माहिती आहे.


या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याला पोलीस मुख्यालयात बोलावून तिच्याशी सविस्तर चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत. तिच्या निवेदनानंतर पुढील आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर असलेल्या मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सहकाऱ्यांच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे एका महिला पोलिसाचा जीव वाचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.









Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी