Advisory For Indians : भारतीयांना तत्काळ इराण सोडण्याचे आदेश

तेहरान : इराणआणि इस्रायलमधील लष्करी संघर्ष कमालीचा वाढला असून मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. रविवारी इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागल्यानंतर, इस्रायलनेही इराणच्या मुख्य भूमीवर प्रतिहल्ला केला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत, उपलब्ध मार्गांचा वापर करून तात्काळ देश सोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच इतर भारतीयांना इराणचा प्रवास न करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी या परिस्थितीला अमेरिका थेट जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, इस्रायलने हल्ले सुरूच ठेवल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'बाब-अल-मंदेब' हा समुद्री मार्ग बंद केला जाईल, अशी धमकी इराणने दिली आहे. हा जलमार्ग आशिया, युरोप आणि अरब देशांमधील व्यापाराचा मुख्य कणा असल्याने, इराणच्या या इशाऱ्यामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे