Chhagan Bhujbal : मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का नहीं!

मंत्री छगन भुजबळ; 'पक्षात मी नाराज नाही, इतरांना न्याय मिळाला तसा मलाही मिळावा'


मुंबई : "राज्यसभेच्या उमेदवारीवरून मी नाराज नाही. मला लोकसभा किंवा राज्यसभेत जाण्याच्या यापूर्वी ४-५ वेळा संधी आल्या, पण दुर्दैवाने त्या हुकल्या. पक्षात इतरांच्या कुटुंबातील सदस्यांना जसा न्याय मिळाला, तसाच तो मलाही मिळावा, हीच माझी भूमिका होती. 'मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का नहीं!' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) (NCP) ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकला.


पुतणे समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद देण्याची अट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फेटाळल्यामुळे भुजबळ कमालीचे नाराज झाले असून त्यांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारली, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या नाट्यमय घडामोडींनंतर पक्षाने माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळ यांच्या 'सातपुडा' निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात पोहोचले. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.



भुजबळ म्हणाले, "मकरंद पाटील राज्यात मंत्री आहेत आणि त्यांचे भाऊ राजसभेत खासदार आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांचे पुत्र पार्थ पवार राज्यसभेत आहेत. सुनील तटकरे यांच्याही कुटुंबात पदे आहेत. त्यामुळे हाच नियम मला लागू करून माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा आणि मला राज्यसभेत पाठवावे, असे मी म्हटले होते. हा पक्ष स्थापन करण्यात माझाही पुढाकार आहे. त्यामुळे इतरांची मुलंबाळं जशी मंत्री, आमदार, खासदार आहेत, तसाच न्याय मला आणि माझ्या मुलांना मिळावा, ही मागणी गैर नाही," असे भुजबळ म्हणाले.


भाजपचा विरोध नव्हता

भाजपने (BJP) समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा प्रस्ताव फेटाळल्याच्या वृत्ताचा भुजबळांनी इन्कार केला. "आमचा हा प्रस्ताव दिल्लीत भाजप श्रेष्ठींकडे पोहोचायला वेळ लागला असावा. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा एकच दिवस शिल्लक होता. त्यामुळे भाजपकडून 'जेव्हा राज्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होईल, तेव्हा यावर विचार करू' असे सकारात्मक उत्तर आले. त्यामुळे भाजपने नकार दिला, या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही," असा खुलासा त्यांनी केला. "आज नाही तर उद्या मला नक्कीच न्याय मिळेल," असा विश्वास व्यक्त करत त्यांनी 'मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का नहीं!', असा टोलाही पक्ष नेतृत्त्वाला लगावला.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.