Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा भंग


मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राजशिष्टाचाराचे (प्रोटोकॉल) उल्लंघन झाल्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ६ जून रोजी झालेल्या या शासकीय सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रणच दिले गेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) सिडको प्रशासन आणि अदानी नवी मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीला 'कारण दाखवा' (शो-कॉज) नोटीस बजावून तातडीने स्पष्टीकरण मागवले आहे.



शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फुटी कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र, या शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे गायब असल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे, शासकीय सोहळ्यात 'व्हीआयपी प्रोटोकॉल'च्या नियमांकडे डोळेझाक करून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दूर का ठेवले, याचा जाब मुख्यमंत्री कार्यालयाने सिडको आणि विमानतळ प्रशासनाला विचारला आहे. तसेच, भविष्यात अशा नियोजनात शिष्टाचाराचे नियम सक्तीने पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने