Indian Seafarers Rescue : संकटात सापडलेल्या जहाजावरून एअरलिफ्ट केले, भारताच्या खलाशांना ओमानने वाचवले

ओमान : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, 'होर्मुझ सामुद्रधुनी'च्या दक्षिणेला २४ भारतीय खलाशी असलेल्या 'एमटी मारिव्हिक्स' या जहाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. या जहाजावर आग लागल्याच्या घटनेला केंद्रीय बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने सोमवारी दुजोरा दिला. जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सध्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मंत्रालयाने सांगितले.ओमानने हेलिकॉप्टरद्वारे खुलाशांना एअरलिफ्ट केले आहे.





सोमवारी दुपारी सुमारे दीड वाजता जहाजावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली, यानंतर भारत सरकारच्या प्रतिनिधीने जहाज कंपनीशी संपर्क साधला. भारताचा ओमानमधील दूतावास पण सक्रीय झाला. ओमान सरकार तसेच जहाजावरील खलाशी यांच्याशीही समन्वय साधण्यात आला. काही वेळानंतर ओमानच्या हेलिकॉप्टरद्वारे टप्प्याटप्प्याने भारतीय खुलाशांना एअरलिफ्ट करून वाचवण्यात आले. सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत.






याआधी रिकामे तेलवाहक जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडून दक्षिणेच्या दिशेने बरेच पुढे गेले होते. या जहाजावर भारतीय खलाशी होते. नेमका याच जहाजावर हल्ला झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणचे जहाज समजून अमेरिकेकडूनच या रिकाम्या जहाजावर हल्ला झाला होता.


युनियनने सोशल मीडियावर मागितली मदत


'फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया'ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक पोस्ट करून ओमानच्या किनारपट्टीजवळ अडकलेल्या भारतीय खलाशांसाठी तातडीने मदतीची मागणी केली होती. या पोस्टची त्वरित दखल घेत ओमानमधील भारतीय दूतावासाने जहाजावरील खलाशांशी थेट संपर्क प्रस्थापित केला असून आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे सांगितले.



३,५०० हून अधिक खलाशांची सुरक्षित सुटका


पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाने 'डीजी शिपिंग'च्या माध्यमातून २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. या नियंत्रण कक्षाने आतापर्यंत १२ हजारांहून अधिक कॉल्स आणि २६ हजारांपेक्षा जास्त ईमेल्स हाताळले आहेत. गेल्या ९६ तासांतच खलाशांच्या कुटुंबीयांकडून ३९० कॉल्स आले आहेत. नियंत्रण कक्षाने समन्वय साधल्यामुळे ३५०० पेक्षा जास्त खुलाशांना संकटातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे