Sanjay Nirupam : नाशिक TCS प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! मलेशियाचा थेट संबंध असल्याचा दावा

MUMBAI : नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असून मलेशियातील टीसीएसचा थेट संबंध असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन निरुपम यांनी मलेशियात बसलेला फरार आरोपी इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक व ‘एमआयएम’च्या नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच पॉश कायद्याची (POSH) अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केल्याबद्दल ‘टीसीएस’वर कारवाई होणे आवश्यक आहे, असे निरुपम यांनी सांगितले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



निरुपम म्हणाले की, ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रांमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यासाठी तिला सोशल मीडियावरील झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून तिचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न आरोपींकडून सातत्याने करण्यात आला. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा खान, दानिश शेख, तौफिक अत्तार हे तिघेच सूत्रधार नाहीत तर त्यांच्या पाठीशी मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे. दानिश आणि तौफिक हे पिडितेला मलेशियाला पाठवणार होते, असेही आरोपत्रात म्हटले आहे. त्यामुळे आरोपींचे मलेशियाशी थेट संबंध होते, हे स्पष्ट दिसतंय असे निरुपम म्हणाले. याच मलेशियात फरार आरोपी झाकीर नाईक लपून बसला आहे. या झाकिर नाईकची संस्था किंवा एजन्सी महाराष्ट्रात कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्या हिंदु मुलींना धर्मांतरासाठी टार्गेट करत आहेत का, याबाबत तपास यंत्रणांनी चौकशी करायला हवी, अशी मागणी निरुपम यांनी केली.



निरुपम पुढे म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी निदा खान ४० दिवस फरार होती. पोलीसांच्या शोध मोहीमेत ती छत्रपती संभाजी नगरमधील ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरी कुटुबांसह सापडली. यात निदा खान आणि नगरसेवक मतीन पटेल यांना पोलीसांनी अटक केली. पोलीस चौकशीत मतीन पटेल याने वारंवार इम्तियाज जलीलचे नाव घेतले होते. जलील हे एमआयएमचे महाराष्ट्राचे प्रमुख आणि माजी खासदार आहेत. ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभागात निवडून आलेली ‘एमआयएम’ची नगरसेविका मुंब्र्याला हिरवे करणार असा दावा करते. यावेळी तिच्या सोबत असलेले इम्तियाज जलील तिथं केवळ मुंब्राच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार असे जाहीर वक्तव्य करुन वाद निर्माण करतात. त्यामुळे टीसीएस प्रकरणात ‘एमआयएम’चा सहभाग असू शकतो, असा आरोप निरुपम यांनी यावेळी केला. तपास यंत्रणांनी ‘एमआयएम’च्या नेत्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.

संपूर्ण प्रकरण ज्या कंपनीत घडले त्या टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीवर पॉश कायद्याची (POSH) काटेकोर अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.


महाराष्ट्रातील बड्या कॉर्पोरेट्सची चौकशी करावी


नाशिकमधील टीसीएस प्रकरणाची राज्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील आयटी, फार्मा आणि मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये महिला कर्मचारी सुरक्षितरित्या काम करत आहेत का, याबाबत पोलीस आणि राज्य सरकारने चौकशी करायला हवी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.
Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''