Sangli Crime : धक्कादायक! 30 लाखांच्या विम्यासाठी मेहुण्यानेच रचला कट; सांगलीतील खुनाचे गूढ उलगडले

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. मिरज-पंढरपूर महामार्गावर संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत (Deathbody) आढळलेल्या दत्तात्रय चाबरे यांच्या मृत्यूमागे अपघात नसून नियोजित खून (Murder) असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, विम्याची रक्कम मिळवण्यासाठी हा कट मृत व्यक्तीच्या मेहुण्यानेच रचल्याचा आरोप आहे. (Sangli Murder Case)


मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी दत्तात्रय चाबरे यांचा मृतदेह महामार्गालगत आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते. मात्र घटनास्थळावरील काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेत असताना धक्कादायक माहिती समोर आली.



तपासात असे निष्पन्न झाले की, दत्तात्रय चाबरे यांच्या नावावर ३० लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला होता. या विम्याचे हप्तेही त्यांचे मेहुणे रामचंद्र खिलारे भरत होते. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी चाबरे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला.


यासाठी रामचंद्र खिलारे याने तुकाराम सांगोलकर याला ३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. दोघांनी मिळून चाबरे यांची हत्या करून तिला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.


या प्रकरणी पोलिसांनी रामचंद्र खिलारे आणि तुकाराम सांगोलकर या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची पुढील चौकशी सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.


या प्रकरणाचा उलगडा केल्यानंतर पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक होत असून विम्याच्या पैशांसाठी नातेसंबंधांनाही तिलांजली दिल्याची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी