मोठी बातमी ! तळेगाव MIDC मध्ये 'मृत्यूचा गॅस'! कंपनीत CO₂ गळतीने दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Pune Breaking News : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात आज एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे (Navlakh Umbare)  येथील शॅफ्लर इंडिया कंपनीमध्ये अचानक झालेल्या कार्बन डायऑक्साइड म्हणजेच CO₂ गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण औद्योगिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



कार्बन डायऑक्साइड गॅसची गळती


सुरुवातीला कंपनीत गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas cylinder explosion) झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्राथमिक तपासात धक्कादायक बाब उघड झाली असून, प्रत्यक्षात कंपनीत कार्बन डायऑक्साइड (Carbon dioxide) गॅसची गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गळतीने काही क्षणांतच भीषण स्वरूप धारण केले आणि कामगारांच्या जीवावर बेतले.



दोन कुटुंबांचा आधार हिरावला


या दुर्दैवी दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे कंपनी परिसरात एकच गोंधळ उडाला. तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.



आपत्कालीन यंत्रणा सक्रिय


घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली. प्लांटमधील इतर कर्मचाऱ्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. एमआयडीसी सुरक्षा विभाग, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.


दरम्यान, ही गॅस गळती नेमकी कशामुळे झाली? यामागे तांत्रिक बिघाड होता का? सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी की मानवी निष्काळजीपणा? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. या सर्व बाबींचा सखोल तपास पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सुरू करण्यात आला आहे.



दुर्घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण


घटनेनंतर तळेगाव एमआयडीसीतील (Talegaon MIDC) इतर उद्योगांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कामगार संघटनांनी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


एका क्षणात दोन कुटुंबांचा आधार हिरावला गेला, तर तिघेजण मृत्यूशी झुंज देत आहेत. तळेगाव MIDC मधील ही घटना केवळ अपघात नाही, तर औद्योगिक सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर दुर्घटना ठरत आहे. आता या प्रकरणात नेमकी जबाबदारी कुणाची ठरणार? आणि निष्काळजीपणावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने